शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

शेतक-याने उभ्या कपाशीतच फिरविला ट्रॅक्टर, धामणगाव तालुक्यातील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 4:36 PM

बोंडअळीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कापूस उत्पादन होणे नाही, याची खात्री करून तालुक्यातील निंबोली येथील एका शेतक-याने दोन एकरातील डौलात असलेल्या कपाशी पिकावर रविवारी ट्रॅक्टर फिरविला.  

- मोहन राऊत

धामणगाव रेल्वे (अमरावती) : बोंडअळीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कापूस उत्पादन होणे नाही, याची खात्री करून तालुक्यातील निंबोली येथील एका शेतक-याने दोन एकरातील डौलात असलेल्या कपाशी पिकावर रविवारी ट्रॅक्टर फिरविला.  तालुक्यातील शेतकरी पूर्वी कपाशीऐवजी सोयाबीन पिकाची शेती करायचे. मात्र, काही वर्षांपासून सोयाबीन उत्पादनात प्रचंड घट झाली. जेमतेम हाती आलेल्या शेतमालाला शासनदरबारी योग्य भाव मिळत नसल्याने शेतक-यांनी सोयाबीन उत्पादनाकडे पाठ फिरवीत कपाशी लागवडीकडे वळले. मात्र, या पिकांवर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतक-यांवर उभे पीक उपटण्याची वेळ आली आहे. सध्या कपाशी पीक फुल-पात्यांसह लहान-लहान बोंडावर आहे. त्यातच बोंडअळीचे प्रमाण प्रचंड वाढल्याचे प्रत्येक झाडाचे निरीक्षणांती दिसून आले. बोंडअळी हा प्रकार सहजरीत्या नष्ट होत नसल्याचे मागील वर्षीचे अनुभव पाहता ते परिसरातील पीक नष्ट करणार, हे शतप्रतिशत खात्री झाल्याने निंबोली भोंगे येथील शेतकरी अरविंद विठोबाजी सोनोने तीन एकरांतील बोंडअळी बाधित कपाशी छटकभरही कापूस घरी आले नसताना पूर्णत: पीकच ट्रॅक्टरने मोडून काढले. कारण त्याच तीन एकराच्या आजूबाजूला त्याचीच दोन एकर लागवणने केलेली शेती असून, त्यातही कपाशी पीक बहरले आहे. अशा शेतकºयांनी शेतात फेरोमोन ट्रॅप लावावा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. येथील बोंडअळी बाजूच्या शेतात जाण्याच्या भीतीने त्याने तीन एकरातील बोंडअळी बाधित संपूर्ण पीकच रविवारी ट्रॅक्टरच्या सहाय्याने दोन एकराती पºहाटी उपटून ते वाळवून जाळण्याचा निर्णय घेतला असल्याचे ते 'लोकमत'शी बोलताना म्हणाले.

बीजी-३ ची परवानगी दिल्यास शेतकºयांचे नुकसान टळणारशासनाने बीटी बियाण्यात बीजी-२ परवानगी दिली आहे. मात्र, बीजी-२ हे निकामी झाल्याचे पत्र मोन्सॅन्टो कंपनीने शासनाला दिले असून, बीजी-३ ची परवानगी मागितली होती. ती मिळाल्यास शेतकºयांचे नुकसान टळणार होते. मात्र, शासनाने ती नाकारली. कारण बीजी-३ ची परवानगी दिल्यास पर्यावरणाला त्यापासून धोका निर्माण होण्याचे संकेत आहे.

 कपाशी लागवडीचा ४५ हजार रुपये खर्चअरविंद सोनोने यांनी तीन एकरात केलेल्या कपाशी लागवडीसाठी ४५ हजार रुपये खर्च केले. कपाशीवर बोंडअळीने आक्रमण केल्यामुळे  ट्रॅक्टर फिरविले.  यामुळे त्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.  तालुक्यातील प्रत्येक गावात बोंडअळीवर उपाययोजनेसाठी शेतकºयांची कार्यशाळा घेतली. शेतकºयांना कृषी विभागामार्फत मार्गदर्शन करण्यात आले. बोंडअळीग्रस्त भागातील शेतकºयांनी कृषी विभागाशी संपर्क साधावा.- अजय तळेगावकर, तालुका कृषी अधिकारी

गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात बोंडअळी पडली. १० डिसेंबरपर्यंत तीन एकरात २७ क्विंटल कापूस घरी आले. त्यानंतरही प्रत्येक झाडाला ५० ते ६० बोंडे होती. मात्र, प्रकोपामुळे बोंडे किडल्याने किलोभरही कापूस आला नाही. अखेर पूर्ण पीक मोडीत काढले. यावर्षीही तीच स्थिती दिसून आल्याने इतरही शेतातील पीक बाधित होऊ नये, यासाठी बोंडअळीबाधित कपाशी पीक मी त्वरेने नष्ट करण्याचा निर्णय घेतला. - अरविंद सोनोने, शेतकरी निंबोली

टॅग्स :Amravatiअमरावती