धारणी : तालुक्यातील मोखा गावातील आदिवासी शेतकऱ्याचा डवरणी करीत असताना अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला. मंगळवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. त्याच्या दोन बैलांचाही जागीच अंत झाला.
प्राप्त माहितीनुसार, धारणी तालुक्यातील मोखा गावातील शेतकरी शंकर साबूलाल दहिकर (५०) हे त्यांच्या स्वत:च्या चिचघाट गावाच्या शिवारात असलेल्या अडीच एकर शेतात धानाच्या पिकाला बैलजोडीच्या साहाय्याने डवरणी करीत होते. दुपारच्या सुमारास विजेचा कडकडाट व जोरदार पाऊस सुरू झाला. त्याच दरम्यान वीज कोसळली. शकर त्व यांच्या व सोबत असलेल्या दोन बैला च्या अंगावर वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तो तेथेच पडून असताना शेजारच्या शेतातील शेतकरी मुन्ना भैयालाल कासदेकर याला त्याच्या शेतातून दोन बैल खाली पडल्याचे दिसून आल्याने त्याने घटनास्थळी धाव घेतली असता त्याला शँकर व त्याच्या दोन बैलांच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे आढळून आले त्यांनतर त्याने गावाकडे धाव घेत शँकर याच्या कुटुंबियांना माहिती दिली असता त्यांनी घटनास्थळी धाव घेतली तेथे शँकर चा मृतदेह पाहून सर्वांनी शेतातच आक्रोश घातला त्यांनतर शँकर चा मृतदेह शवविच्छेदना करिता रुग्णवाहिकेने उपजिल्हा रुग्णालयात आणला याबाबत त्याचा मोठा भाऊ शेखलाल साबूलाल दहिकर व गावातील आळा पटेल शँकर मोतीराम मावस्कर यानी धारणी पोलिसात तक्रार दिली आहे पुढील तपास धारणी पोलीस करत आहे
बॉक्स
चार भावा नंतर सर्वात लहान भाऊ होता शँकर दहिकर
शँकर दहिकर याला मोठे चार भाऊ आहे त्यातील तिघांनी त्यांची स्वताची शेती घेऊन त्यात ते शेतपिक पिकवून स्वताचा उदरनिर्वाह करतात तर शँकर पेक्षा मोठा भाऊ व शँकर हे दोघे त्यांच्या कडील पाच एकर शेती पैकी अडीच अडीच एकर शेतीत पेरणी करून आपला उदरनिर्वाह करतात शँकर ला त्याची पत्नी व पाच मुली व एक मुलगा असा आप्त परिवार आहे