नांदगाव खंडेश्वर : भारतीय कम्युनिस्ट पक्ष व किसान सभा, शेतमजूर युनियन, एआयएसएफ, अखिल भारतीय नवजवान सभा, आयटक व संयुक्त किसान मोर्चाच्यावतीने क्रांती दिनी बस स्थानक परिसरात धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी उपस्थित कार्यकर्ते व शेतकरी शेतमजुरांनी मोदी सरकारविरुद्ध घोषणा दिल्या.
शेतकरीविरोधी तीन कायदे रद्द करा. कामगार विरोधी कायदा रद्द करा. महागाईला आळा घाला. प्रस्तावित वीज बिल कायदा मागे घ्या. शेतकऱ्यांना सन २०२१ च्या पीक विम्याची रक्कम अदा करा, या प्रमुख मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. या आंदोलनाचे निवेदन तहसीलदारांना सादर करण्यात आले. या आंदोलनात बहुसंख्येने विविध संघटनेचे पदाधिकारी तथा महाराष्ट्र राज्य लालबावटा शेतमजूर युनियनचे विभागीय संपर्क प्रमुख संजय मंडवधरे, भाकपचे जिल्हा सचिव सुनील मेटकर, गणेश अवझाडे, भाकप तालुका सचिव संतोष सुरजुसे, विनोद तरेकर, ओमप्रकाश सावळे, हरिदास राजगिरे, हरिदास देशमुख, मनोज गावनर,सागर कोल्हे, रेखा नवरंगे, जया मंडवधरे, इसराइल शाह, बाबाराव इंगळे, मोरेश्वर वंजारी, विनोद वैद्य, विमल इसाळकर, सचिन करडे, सीता मरगडे, जे.एन. राऊत, अमिता मेश्राम, पुष्पा बोरकर, सागर कोल्हे, सचिन करडे, जयश्री कारमोरे, सोनाली वैद्य, दीक्षिता तरेकर, ओमप्रकाश सावळे, राजेश मासोदकर, भगवान भोयर, मनोज वानखडे, अविनाश कणसे, सचिन भोयर, सतीश शिंदे, रमेश लांबट, मुरलीधर वैद्य, रामदास लांजेवार, मीना वैद्य, समशेरखाँ पठाण, माधव ढोके आदी सहभागी झाले.