रोहिणी नक्षत्रात पाऊस झाला, तर मृग नक्षत्रात पाऊस चांगला असतो, असे जुने जाणकार मंडळी सांगतात. हवामान विभागसुद्धा पाऊस वेळेवर येणार असल्याचे सांगत आहे. पेरणी लवकर सुरू झाली, तर बियाणे व खतांची टंचाई निर्माण होऊ शकते. यामुळे बरेच शेतकरी महागडे बियाणे व खते खरेदी करून घरी नेऊन ठेवत आहेत. लॉकडाऊनमुळे बँकेचे काम प्रभावित झाल्याने शेतकऱ्यांचे कृषिकर्ज मिळू शकले नसल्याने त्यांच्यासमोर बियाणे खरेदीचा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. त्यामुळे बँकेसमोर शेतकऱ्यांच्या मोठ्या रांगा दिसत आहेत
एकंदर परिस्थितीचा आढावा घेतला असता, तोंडावर आलेली पेरणी, लॉकडाऊनमुळे हाताला नसलेले काम आणि खिशात नसलेला पैसा पाहता, स्त्रीधन गहाण ठेवून पेरणीसाठी बियाण्यांची जुळवाजुळव करताना ग्रामीण भागातील शेतकरी दिसत आहेत.
------------
कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन
परवानाधारक विक्रेत्यांकडून बियाणे खरेदी करावे. पावतीवर विक्रेत्याची व शेतकऱ्याची सही किंवा अंगठा असावा. पावतीवर छापील बिल क्रमांक असल्याची खात्री करून घ्यावी व खरेदी बिल जपून ठेवावे. शेतकरी वर्गाने विक्रेत्यांकडून मुदतबाह्य व पॅकिंग फोडलेले बियाणे खरेदी करू नये. बियाण्याच्या पिशवीवर असलेल्या किमतीपेक्षा जास्त दरात बियाणे खरेदी करू नये. शेतकऱ्यांनी परवानाधारक विक्रेत्यांकडून बियाण्यांची खरेदी करावी. खरेदीच्या वेळी पक्के बिल घ्यावे, कच्चे बिल स्वीकारू नये. बिलावर दुकानाचे नाव उत्पादनाचे नाव, खरेदी दर, खरेदीदाराचे नाव, बियाणे नाव, स्लॉट नंबर, विक्री किंमत टाकली आहे किंवा नाही याची खात्री करून घ्यावी.
----------------
गतवर्षी शेतात पाहिजे तसे उत्पन्न झाले नसल्याने बँकेचे कर्ज भरता आले नाही. त्यामुळे पेरणीसाठी, बियाणे घेण्याकरिता पैसे कोठून आणावे? शेत पेरले नाही, तर वर्षभर संसाराचा गाडा कशाच्या भरवशावर हाकावा, हा प्रश्न आहे.
- नंदकिशोर देशमुख, शेतकरी, अंजनगाव सुर्जी
-----------------
मी अल्पभूधारक शेतकरी असून, गतवर्षी पाहिजे तसे पीक झाले नसल्याने लागवण खर्चसुद्धा निघाला नाही. त्यामुळे यावर्षी भरमसाठ वाढलेल्या बियाण्यांच्या किमतीमुळे यावर्षी पेरणी कशी करावी?
- देविदास पाटील, शेतकरी, पांढरी खानमपूर