लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : तिवसा तालुक्यातील वºहा येथील शेतीपिके वन्यप्राणी फस्त करीत आहेत. त्यामुळे वनाच्या सीमेला कुंपण घालण्यात यावे किंवा शेतकºयांच्या शेतीला कुंपण घालण्यासाठी अनुदान द्यावे, तसेच वन्यप्राण्यांनी फस्त केलेल्या पिकांची भरपाई द्यावी आदी मागण्यांचे निवेदन आ.यशोमती ठाकूर यांनी सोमवारी जिल्हाधिकाºयांना दिले.वºहा येथील गट क्रं १५९, १६२, १६० यासह अन्य भागातील शेतीपिकांचे नीलगाय, रानडुकरांसह अन्य वन्यप्राणी नुकसान करीत आहे. शेतकºयांना रात्रंदिवस शेतातच राहावे लागत आहे. त्यामुळे वनांच्या सीमा बंदिस्त कराव्यात किंवा शेतकºयांना कुंपणासाठी अनुदान द्यावे. तसेच उपद्रवी वन्यप्राण्यांना वनविभागाने मारावे किंवा शेतकºयांना तशी परवानगी द्यावी. शेतकºयांच्या झालेल्या नुकसानीसाठी त्यांना अर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आ. यशोमती ठाकूर यांनी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना निवेदनाद्वारे केली. यावेळी प्रदीप ससाने, दीपक राऊत, नजीर खाँ, चंद्रभान मेहरे, रवींद्र हटवार, अमोल मेहरे, लक्ष्मण मेहरे, सुखदेव मेहरे आदी उपस्थित होते.
शेतीपिकांना वन्यजीवांपासून धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2017 10:08 PM
तिवसा तालुक्यातील वºहा येथील शेतीपिके वन्यप्राणी फस्त करीत आहेत.
ठळक मुद्देशेतकºयांना भरपाई द्या : यशोमती ठाकुरांची जिल्हाधिकाºयांकडे मागणी