संदीप मानकर दर्यापूरसततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून तालुक्यातील कळाशी येथील शेतकऱ्याने आत्महत्या केल्यानंतर संतप्त गावकऱ्यांनी त्याचा मृतदेह दर्यापूर येथील उपविभागीय कार्यालयातील एसडीओंच्या कक्षात आणल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता. गजानन जानराव इंगळे (४०) यांनी १८ नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता स्वत:च्या शेतात फवारणी सुरू असताना विषारी औषध प्राशन केले होते. शेतातील अन्य लोकांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ गजानन इंगळे यांना येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.शासनाकडून होतेय थट्टा दर्यापूर : दोन दिवस उपचार केल्यानंतर प्रकृतीत सुधारणा न झाल्याने २० नोव्हेंबर रोजी दुपारी ५ वाजता सदर शेतकऱ्याची प्राणज्योत मालवली. रात्र झाल्यामुळे शवविच्छेदन येथील उपजिल्हा रुग्णालयात २१ नोव्हेंबरला सकाळी करण्यात आले. दर्यापूर तालुक्यात वर्षभरात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. परंतु अद्याप त्यांना शासनाची मदत न मिळाल्याचे कळते. इंगळे या शेतकऱ्याच्या कुटुंबियांना तत्काळ मदत मिळावी यासाठी मृतदेह कळाशीला नेत असताना अचानक शेतकरी नेते विजय विल्हेकर यांच्या नेतृत्वात १५ ते २० कार्यकर्त्यांनी दुपारी ११.३० वाजता मृतदेह उपविभागीय कार्यालयात आणला व मृतदेह समोर ठेऊन त्यांना मृतदेहाचे समक्ष निवेदन सादर केले. यावेळी भैय्या बरवट, विजय विल्हेकर, अशोक राणे, प्रदीप गावंडे, सुरेश ठाकरे, अरूण तायडे, गणेश इंगळे आदी उपस्थित होते.
शेतकऱ्याचा मृतदेह एसडीओ कार्यालयात
By admin | Published: November 21, 2014 11:59 PM