करजगाव : चांदूर बाजार तालुक्यात मूग आणि उडीद ही पिके प्रामुख्याने घेतले जाते. परंतु निसर्गाच्या असमतोलपणामुळे शेतकऱ्यांच्या तोंडातला घास हिसकला गेला. शेतकऱ्यांनी फार आशेने पीक विमा काढला. मात्र, अजूनपर्यंत शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा पैसा मिळालेला नाही.
सामाजिक कार्यकर्ते सागर मोहोड व अन्य शेतकऱ्यांनी ही बाब चांदूर बाजारच्या तहसीलदारांच्या निदर्शनास आणून दिली व शेतकऱ्यांच्या हक्काचा पैसा लवकरात लवकर त्यांच्या खात्यामध्ये जमा करावा, अशी विनंती केली. यावेळी विक्रांत डोंगरे, पंकज वानखडे उपस्थित होते. शासन अतिवृष्टीची मदत देऊ शकते, तर विमा कंपन्या विम्याचे पैसे देण्यासाठी का टाळाटाळ करीत आहे, असा सवाल करण्यात आला.