लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महावितरणचा भोंगळ कारभार व निष्काळजीपणामुळे एका शेतकऱ्याचा लोंबकळलेल्या वीज तारांच्या स्पर्शाने मंगळवारी सकाळी करुण अंत झाला. रूपराव नागोराव ठाकरे (६८, रा. सालोरा बु.) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.सालोरा शिवारातील विद्युत खांब व तारा जमिनीच्या टेकल्या आहेत. नागरिकांनी अनेकदा महावितरणला कळवूनही याबाबत उपाययोजना झाल्या नाहीत. या मुद्द्यावर संतप्त गावकऱ्यांनी रोष व्यक्त केल्याने अमरावतीच्या इर्विन रुग्णालयात शवविच्छेदनादरम्यान तणावसदृश स्थिती निर्माण झाली होती. संबंधित दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध कायदेशिर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन महावितरण अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर गावकऱ्यांचा रोष निवळला.दरम्यान, ठाकरे कुटुंबीयांकडे सालोगा बु. गावानजीक दोन ते तीन एकर शेती आहे. मंगळवारी सकाळी ९ वाजता रूपराव ठाकरे हे शेतात गेले. यादरम्यान पाऊस सुरू झाला. दुपारी ३ वाजेपर्यंत ते घरी परतले नसल्याचे पाहून कुटुंबीयांनी शेतात जाऊन बघितले असता, रूपराव जमिनीशी समांतर विद्युत खांबाजवळ निपचित पडलेले होते. त्यांचा मृत्यू झाल्याचे कळताच कुटुंबीयांचा आक्रोश सुरू झाला. तारेमध्ये विज प्रवाह असल्यामुळे कुणी रूपराव यांना स्पर्श करू शकले नाही. या घटनेची माहिती वलगाव पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. यादरम्यान कुटुंबीय व पोलिसांनी महावितरण अधिकाऱ्यांशी संपर्क केला. मात्र, दुपारी ३ नंतर वीज अधिकाऱ्यांनी फोन बंद करून ठेवले. त्यामुळे कुणाशीच संपर्क होत नव्हता. बराच वेळ निघून गेल्यानंतरही कुणीच तेथे पोहोचले नाही. सायंकाळ होत असल्याचे पाहून पोलिसांनी रूपराव यांचा मृतदेह ताब्यात घेऊन जिल्हा सामान्य रुग्णालयात आणला. सरपंच महेश दिवाण यांनी महावितरण अधिकाऱ्यांशी संपर्क करून त्यांना येथे बोलाविले. अमरावती ग्रामीण सर्कलचे उपकार्यकारी अभियंता उज्ज्वल गावंडे व गोकुल मोरे यांच्यासमोर गावकरी व नातेवाइकांनी घटनेची आपबिती मांडली.पोलिसांची तारांबळअमरावती : शिराळा विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळेच रूपराव ठाकरे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला. त्यामुळे तेथील अधिकारी व कर्मचाºयांवर कारवाई करा, त्यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा, अशी मागणी नातेवाइकांसह गावकऱ्यांनी रेटून धरल्याने पोलिसांचीही ताराबंळ उडाली. वाढता तणाव पाहता, पोलिसांचा मोठा ताफा इर्विनला पोहोचला. यादरम्यान आ. यशोमती ठाकुर यांनीही इर्विन जाऊन घटनेची माहिती घेतली. महावितरण अधिकाऱ्यांना या निष्काकाळजीपणाचा जाब विचारला. त्यानंतर महावितरण अधिकाºयांनी दोषीवर कायदेशीर कारवाईचे लेखी आश्वासन दिले.
महावितरणने घेतला शेतकऱ्याचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 6:00 AM
सालोरा शिवारातील विद्युत खांब व तारा जमिनीच्या टेकल्या आहेत. नागरिकांनी अनेकदा महावितरणला कळवूनही याबाबत उपाययोजना झाल्या नाहीत. या मुद्द्यावर संतप्त गावकऱ्यांनी रोष व्यक्त केल्याने अमरावतीच्या इर्विन रुग्णालयात शवविच्छेदनादरम्यान तणावसदृश स्थिती निर्माण झाली होती.
ठळक मुद्देनिष्काळजीपणाचा कळस : सालोºयात हळहळ, इर्विनमध्ये तणाव