लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दिवाळी सणाला प्रारंभ होताच अवकाळी पावसाचे दमदार आगमन झाल्यामुळे जिल्हाभरात शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे सोयाबीन, कापूस, संत्रा व अन्य पिकांचे तातडीने पंचनामे करून नुकसानभरापाई देण्यात यावी, अशी मागणी गुरूवार, ३१ आॅक्टोबर रोजी युवा स्वाभिमान पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाव्दारे अपर जिल्हाधिकारी संजय पवार यांच्यामार्फत शासनाकडे केली आहे.ऐन दिवाळीच्या तोंडावर आलेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील सोयाबीन, कपाशी, उडीद, तूर, संत्रा पालेभाज्या आदी पिके नेस्तनाबूत झाले. या नुकसानामुळे शेतकरी राजा आर्थिक संकटात सापडला आहे. एकीडके दिवाळी, तर दुसरीकडे पिकांचे मोठ्या प्रमाणात झालेले नुकसान यामुळे हाता-तोंडाशी आलेली पिके गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. सलग तीन-चार वर्षांपासून नापिकीने धाराशाही पडलेल्या शेतकऱ्यांना सावरण्याकरिता या सर्व नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून शासनाने ५० हजार रुपये भरपाई द्यावी, अशी मागणी युवा स्वाभिमानने केली आहे. निवेदन देताना जिल्हाध्यक्ष राजू रोडगे, आशिष कावरे, मंगेश इंगोले, उमेश ढोणे, अमोल पवार, प्रवीण पवार, मधुकर जाधव, रामेश्र्वर सरडे, विजय पिंपळक व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
ऐन दिवाळीत शेतकरी संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2019 1:30 AM
ऐन दिवाळीच्या तोंडावर आलेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील सोयाबीन, कपाशी, उडीद, तूर, संत्रा पालेभाज्या आदी पिके नेस्तनाबूत झाले. या नुकसानामुळे शेतकरी राजा आर्थिक संकटात सापडला आहे. एकीडके दिवाळी, तर दुसरीकडे पिकांचे मोठ्या प्रमाणात झालेले नुकसान यामुळे हाता-तोंडाशी आलेली पिके गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
ठळक मुद्देनुकसानभरपाईची मागणी : युवा स्वाभिमानचे निवेदन