शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

कृषी वीज जोडणीसाठी शेतकऱ्यांना भुर्दंड

By admin | Published: December 01, 2014 10:47 PM

बागायती शेतकऱ्यांना प्रामुख्याने समर्पित पायाभूत सुविधेद्वारे (डीडीएफ) मधून वीज जोडणी देण्याच्या सूचना महावितरणने काढल्या. मात्र वीज नियामक मंडळाचे आदेश व वीज कायद्यातील

अमरावती : बागायती शेतकऱ्यांना प्रामुख्याने समर्पित पायाभूत सुविधेद्वारे (डीडीएफ) मधून वीज जोडणी देण्याच्या सूचना महावितरणने काढल्या. मात्र वीज नियामक मंडळाचे आदेश व वीज कायद्यातील अनिवार्य तरतुदी बासनात गुंडाळल्याने कृषी वीज जोडणी घेण्यासाठी शेतकऱ्यांना हजारो रुपयांचा नाहक भुर्दंड बसणार आहे. शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्यासाठी महावितरण कंपनीने नियमानुसार निर्धारित कालावधीत वीज जोडण्या दिल्या नाहीत. केवळ प्रतीक्षा यादी वाढविली. आता पायाभूत सुविधांकरिता शासकीय निधी उपलब्ध नसल्याचे कारण दर्शवून शेतकऱ्यांनी स्वत:च जोडणीचा खर्च सहन करुन समर्पित पायाभूत सुविधेद्वारे वीज जोडणी घेण्याबाबत सूचना जारी केल्या. वास्तविक वीज वितरण कंपनीने ग्राहकाने स्वत: विनंती केल्याशिवाय त्याला पायाभूत सुविधा घेण्यास भाग पाडले. वीज ग्राहकांकडून असा खर्च घेण्यात येऊ नये, असा आयोगाचा आदेश आहे. या आदेशाला महावितरणने मात्र हरताळ फासला आहे. महावितरणनेच हस्तक्षेप करुन नियमबाह्य प्रतीक्षा यादी तयार केली आणि साहित्य उपलब्ध नसल्याचा बहाणा व अन्य कारणे दाखवून तीच प्रतीक्षा यादी बहुप्रलंबित दाखविली. ग्राहकांना समभार व परतावा (सीसीआरएफ) या योजनेत सहभागी होऊनच जोडणी देता येईल, अशी परिस्थिती निर्माण केली. या योजनेतून वीज जोडणी घेण्याकरिता नेमका किती खर्च लागतो, याची निश्चित तसेच लेखी माहितीदेखील ग्राहकास पुरविली जात नाही. मात्र ग्राहकाला प्रतिपोल उभारणीसाठी १५ ते १८ हजार रुपयांचा खर्च लागतो. या भांडवली खर्चाचा परतावा ग्राहकांना पूर्णपणे देण्यात येत नाही. या प्रक्रियेमध्ये महावितरणचे अधिकारी, ठेकेदार आणि संस्थांची दिवाळी होत आहे. तर वीज ग्राहकांचे दिवाळे निघत आहे. (प्रतिनिधी)