गतवर्षी पावसाने मोठ्या प्रमाणात दमदार सुरुवात केल्याने शेतकऱ्यांनी मृग नक्षत्रात पेरणी केली होती. परंतु, सोयाबीनचे बियाणेे बोगस निघाल्याने पुन्हा पेरणीला सामोरे जावे लागले. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या मागे न लागता कपाशीला पसंती दिली. परंतु, बियाणे अंकुरण्याआधीच पावसाने दगा दिल्याने पुन्हा शेतकरी चिंतेत सापडला आहे. ज्या शेतकऱ्यांकडे मोटर पंपवर सिंचन करण्याची सुविधा आहे अशा शेतकऱ्यांनी आपल्या शेतात सिंचन करणे सुरू केले असल्याचे चित्र तालुक्यात सध्या तरी दिसत आहे. मात्र, ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय नाही, अशा शेतकऱ्यांनी जमिनीमध्ये ओलावा असल्याने त्या ओलाव्याच्या भरोशावर शेतात पेरणी केली. पावसाचे येत्या काही दिवसांत आगमन झाले नाही, तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येऊ शकते, अशी परिस्थिती सध्या परिसरात निर्माण झाली आहे.
शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे लागली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 4:10 AM