पान २ ची बॉटम
चिखलदरा : तालुक्यातील इंडियन बँकेच्या जारिदा शाखेच्या व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांनी २०० पेक्षा अधिक आदिवासी शेतकऱ्यांना पीककर्जापासून वंचित ठेवल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांना सोमवारी करण्यात आली. कोऱ्या स्लीपवर स्वाक्षरी घेण्यासह घरकुल व इतर खात्यात जमा रक्कम जुन्या पीक कर्जात भरून नूतनीकरण करून नवीन कर्जापासून वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे.
इंडियन बँकेच्या जारिदा शाखेतील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांना पीक कर्जमाफीपासून वंचित ठेवण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी बँक कर्जमाफीबद्दल विचारणा केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. शाखेचे व्यवस्थापक मोहाडीकर व सहायक योगेंद्र लोकांच्या घरी जाऊन कोरे बुकलेट व स्लीपवर परस्पर सह्या करून त्यांचे नूतनीकरण करीत आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यातील व घरकुलाच्या पैशांतून रक्कम कपात करीत आहेत.
बॉक्स
कोऱ्या स्लीपवर स्वाक्षरी आणि अंगठे
शेतकरी कर्जमाफी योजनेस पात्र असताना वसुली व नूतनीकरणाचे काम करीत आहे. सहकार अधिकारी गडलिंग यांच्याशी शेतकऱ्यांनी संपर्क साधला तेव्हा बँकेने शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड केली नाही तसेच सांगतात सर्व प्रकार उघड झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या योजनेपासून वंचित रहावे लागत आहे. बँकेचे कर्मचारी कोऱ्या स्लीपवर सही व अंगठा घेतात व फक्त कागदोपत्री शेतकऱ्यांचा भरणा चलनात दाखवून शासनाची दिशाभूल करीत आहेत. सदर बँकेत २०० कर्जदार शेतकऱ्यांना माफीचे सांगून नूतनीकरण करून बँकेचे चालू वर्षात कर्जवाटप केल्याचे सांगितले. प्रत्यक्षात शासनाची दिशाभूल केली जात असल्याचे तक्रारीत नमूद आहे. जिल्हाधिकाऱ्यांना युवक काँग्रेसचे प्रदेश महासचिव राहुल येवले यांच्या नेतृत्वात तक्रार देण्यात आली. यावेळी नरेंद्र टाले, नारू मुंडे, संजय आलोकार, सखू भुसुम, नमाय तोटा, विनोद धिकार, रामचंद सावलकर, संदीप मुंडे आदी शेतकऱ्यांची उपस्थिती होती.