शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

शेतकऱ्यांजवळील माल संपला आणि हरभरा ७,२५० रुपयांवर गेला!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 11:58 AM

वर्षभरात पहिल्यांदा उच्चांकी भाव : आवक कमी, मागणी वाढली

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदा केंद्र शासनाने हरभऱ्याला ५,४४० रुपये क्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. त्या तुलनेत वर्षभर दर पाच हजारांच्या दरम्यान राहिल्याने शेतकऱ्यांच्या पदरी उत्पादन खर्च पडलेला नाही.

सध्या साठवणूक केलेला हरभरा शेतकऱ्यांजवळ नाही. अशा परिस्थितीत आवक कमी झाली व सणासुदीच्या दिवसांत मागणी वाढली. नवीन हरभऱ्याला अवधी आहे. त्यामुळे हरभऱ्याला सोमवारी उच्चांकी ७,२७२ रुपये क्विंटल भाव मिळाला आहे. जमिनीत आर्द्रता कमी असल्याने गतवर्षी हरभऱ्याच्या सरासरी उत्पादनात कमी आली आहे. 

हंगामापूर्वीच सोयाबीन हमीभावाच्या आतकेंद्र शासनाने सोयाबीनचा हमीभाव ४,८९२ रुपये क्विंटल असा जाहीर केला आहे. दीड महिन्यात नवे सोयाबीन बाजारात येणार आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी येथील बाजार समितीमध्ये सोयाबीनला ४१०० ते ४१७७ रुपये भाव मिळाला आहे. यामध्ये उत्पादन खर्च निघणे कठीण झाले आहे.

हरभऱ्याचे बाजारभाव (रु/क्विं)१५ जुलै - ६००० ते ६३५०१९ जुलै - ६००० ते ६४००२४ जुलै - ६३०० ते ६५६०३१ जुलै - ६२०० ते ६५६२५ ऑगस्ट - ६६५० ते ६९६९७ ऑगस्ट - ६७०० ते ७०४०१२ ऑगस्ट - ७००० ते ७२७२

"सध्या सोयाबीन पेंडला बाजारात मागणी कमी असल्याने दरवाढ होण्याची शक्यता नाही. सणासुदीत हरभऱ्याची मागणी वाढत असल्याने थोडीफार दरवाढीची शक्यता आहे."- संजय जाजू, व्यापारी 

टॅग्स :AmravatiअमरावतीFarmerशेतकरीfarmingशेती