तिवसा : आमदार यशोमती ठाकूर यांनी तिवसा मतदारसंघातील भातकुली तालुक्यातील बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतकºयांच्या पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. शेतकºयांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी आपण हिवाळी अधिवेशनात आग्रही मागणी करणार असल्याचे यशोमती ठाकूर यांनी सांगितले.यंदा कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकºयांचे प्रचंड नुकसान झाले. लागवडीचा खर्चदेखील निघू शकणार नाही, अशी शेतकऱ्यांची अवस्था आहे. बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी व्हावी, यासाठी शेतकºयांनी कृषी विभागाकडे अर्ज सादर करावे, असे आवाहन राज्य शासनाने केले आहे. मात्र, यासाठी असलेल्या निकषाची पूर्तता शेतकºयांकडून शक्य नाही. जसे बियाणे विकत घेतल्याच्या पावत्या सर्वच शेतकºयांनी जपून ठेवल्या नाहीत. परिणामी काही शेतकरी लाभापासून वंचित राहणार आहेत. यामुळे सरकसकट कपाशी पिकाची पाहणी करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.आमदार यशोमती ठाकूर यांनी शेतकऱ्यांची ही अडचण जाणून घेत भातकुली तालुक्यातील दगडागड, वाकी-रायपूर आदी गावांचा दौरा करून कपाशीवरील बोंडअळीच्या नुकसानाची पाहणी केली. यावेळी बोंडअळीच्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. याबाबत प्रशासनाला नुकसान भरपाईची मागणी केलीच होती सोबतच हिवाळी अधिवेशनात सुद्धा आधीच हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना या बोंडअळीच्या नुकसानीची भरपाई त्वरित द्या अशी मागणी लावून धरणार असल्याचे त्यांनी उपस्थित शेतकरी, गावकरी व पदाधिकाºयांना सांगितले.
बोंडअळी नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 10:50 PM
आमदार यशोमती ठाकूर यांनी तिवसा मतदारसंघातील भातकुली तालुक्यातील बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतकºयांच्या पिकांची पाहणी केली.
ठळक मुद्देयशोमती ठाकूर : नुकसानीची पाहणी