शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
2
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
3
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
5
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
6
कपूर कुटुंबात लग्नाची लगबग, पापाराझींसमोर पडता पडता वाचली करिष्मा; व्हिडिओ व्हायरल
7
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
8
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
9
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
11
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
12
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
13
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
14
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
15
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
16
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
17
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
18
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
19
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
20
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...

चांदुरबाजारात सत्तारुढ नगरसेवकांचे पालिका प्रशासनाविरोधात उपोषण

By admin | Published: April 01, 2015 12:26 AM

स्थानिक नगरपालिकेत प्रहारची सत्ता असून स्वत: शिक्षण व आरोग्य सभापती गोपाल तिरमारे ...

चांदूरबाजार : स्थानिक नगरपालिकेत प्रहारची सत्ता असून स्वत: शिक्षण व आरोग्य सभापती गोपाल तिरमारे तसेच त्यांच्या सोबतीला काँग्रेसचे नगरसेवक एजाजअली नगरपालिका कार्यालयात ठिय्या आंदोलनाला बसले. मात्र या आंदोलनाला उर्वरीत १५ नगरसेवकांनी विरोध दर्शविला. स्थानिक नगरपालिकेत कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यापैकी आरोग्य निरीक्षक राजेंद्र जाधव हे कर्तव्यदक्ष कर्मचारी मानल्या जातात. पालिकेत सफाई कर्मचारींची कमी असताना सुद्धा गावातील साफसफाईकडे विशेष लक्ष देणे हे आपले पहिले कर्तव्य समजून गेल्या २२ वर्षापासून पालिकेत आपली सेवा देत आहे. अश्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यावर आरोग्य सभापतीतर्फे कामचुकाराचे आरोप करून सर्वांसमक्ष अर्वाच्य भाषेत वारंवार अपमान केले जात असल्यानी आरोग्य निरीक्षक राजेंद्र जाधव यांनी मुदतपूर्व सेवानिवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवार सकाळी नगरपालिकेत सफाईच्या मुद्यावरून आरोग्य सभापती गोपाल तिरमारे व नगरसेवक एजाजअली यांनी आपल्या दालनात बोलावून अर्वाच्य भाषेत वापर करून अपमानित केले. तसेच या नगरसेवकांचा सफाईच्या मागण्या पूर्ण होत नसल्याने नगरसेवक तिरमारे, एजाजअली यांनी आपल्या निवेदनात आत्महत्येचा इशारा दिला. यामुळे आरोग्य निरीक्षक राजेंद्र जाधव यांनी अचानक मुदतपूर्व सेवानिवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. यावर नगरपालिकेचे वातावरण तापले होते. यावर आरोग्य सभापती तिरमारे, नगरसेवक एजाज अली यांनी कोणतीच पूर्वसूचना न देता नगर पालिका कार्यालयात ठिय्या आंदोलनास सुरुवात केली.परंतु तिरमारे व एजाज अली यांनी ठिय्या आंदोलनाची माहिती पक्षाचे गटनेते, नगराध्यक्ष, मुख्याधिकारी तसेच पोलीस स्टेशनला न दिल्याने या आंदोलनाला कोणताच प्रतिसाद मिळू शकला नाही. या आंदोलनाविरोधात पालिकेचे नगराध्यक्षासह १५ नगरसेवक एकवटले असून हे आंदोलन केवळ प्रसिद्धीकरिता होत असल्याचे सांगितले. नगरसेवक गोपाल तिरमारे यांची अचानक आंदोलनाची भूमिका संशयास्पद असल्याने आरोग्य निरीक्षक जाधव यावरील आरोप करून दबाव टाकून काम करून घेण्याची तिरमारे यांची जुनी सवय असल्याचे उपस्थित नगरसेवकांनी सांगितले. (शहर प्रतिनिधी)