लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : तालुक्यातील नेरपिंगळाई परिसरात शिरलस, सालेमपूर या गावातील शेतकऱ्यांनी बोंडअळीची नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी सुरू केलेले उपोषण अखेर आमदार यशोमती ठाकूर यांच्या यशस्वी मध्यस्थीने मागे घेण्यात आले.नेरपिंगळाई परिसरातील शिरलस सालेमपूर येथील शेतकºयांना सन २०१७-१८ मधील बोंडअळीची नुकसान भरपाई मिळाली नसल्याने शेतकरी सूरज अवचार, संजय सुने, विष्णुपंत कुºहाडे, सुधाकर बरडे, राजेंद्र लोचन यांनी ६ फेब्रुवारीपासून आमरण उपोषण सुरू केले होते. याबाबत त्यांनी आमदार यशोमती ठाकूर यांच्यापुढेसुद्धा कैफीयत मांडली होती. यशोमती ठाकूर यांनी याची गंभीर दखल घेत ८ फेब्रुवारी रोजी उपोषणस्थळी भेट देऊन शेतकºयांसोबत चर्चा केली. प्रशासनालासुद्धा तशा सूचना दिल्यात. त्यानंतर तहसीलदार अनिरूद्ध बक्षी यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आठवडारात या सर्व शेतकºयांना शासनाकडून बोंडअळीची नुकसान भरपाई देण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यामुळे शेतकºयांनी आमरण उपोषण मागे घेतले. यावेळी मोर्शी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश काळे, पंचायत समितीचे माजी उपसभापती अभिजित मानकर, सरपंच खासबागे, गजानन तायवाडे, जितेंद्र ठाकूर, मेहबूब दौला, गजानन ठवळी, खालीलभाई, हरी मोर्तझा, अफसर पठाण, इमरान पठाण, अमोल भोरे, साजित पठाण, पवन काळमेघ, चैतन्य देशमुख यांच्यासह असंख्य शेतकरी उपस्थित होते.
बोंडअळी नुकसान भरपाईसाठी उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 9:41 PM
तालुक्यातील नेरपिंगळाई परिसरात शिरलस, सालेमपूर या गावातील शेतकऱ्यांनी बोंडअळीची नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी सुरू केलेले उपोषण अखेर आमदार यशोमती ठाकूर यांच्या यशस्वी मध्यस्थीने मागे घेण्यात आले.
ठळक मुद्देदखल : यशोमती ठाकूर यांची मध्यस्थी