वीरेंद्र जगताप अधिकाऱ्यांवर संतापले : त्वरित रस्ते करण्याच्या सूचनाअमरावती : चांदूररेल्वे तालुक्यातील बेंबळा प्रकल्पाच्या बॅक वॉटरमुळे शेतकऱ्यांच्या शेतात शिरत आहे. त्यांना शेतीच्याकामांकरिता पांदण रस्ते नाही. रस्त्यांना कामांना तीन वर्षांपासून शासनाने प्रशासकीय मान्यता मिळाली दिली असतानाही व निधी मंजूर असतानाही रस्त्यांचे काम पूर्ण न झाल्याने जलसंपदा विभागाच्या कार्यालयासमोर घुईखेड येथील १५ शेतकरी उपोषणाला बसले आहेत. आ.वीरेंद्र जगताप यांनी सोमवारी उपोषणस्थळी भेट दिली. अधिकाऱ्यांकडून उडवाउघडवीचे उत्तरे मिळाल्याने आ.जगताप चांगलेच संतापले.त्वरित रस्ते पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. बेंबळा प्रकल्पाला या धरणाची वॉटर लेवल ही २७०.२० मीटर एवढी गेली आहे. त्यामुळे धरणाचे बॅक वॉटर घुईखेडसह परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीत शिरते. या कारणाने शेतीचे तर नुकसान होतेच, तसेच ये-जा करण्यासाठी शेतकऱ्यांना रस्ता राहत नाही. २०१३ मध्ये २४ पांदण रस्ते शासनाने मान्यता दिली.आतापर्यंत रस्त्यांचे काम फक्त ६० टक्केच पूर्ण झाल्याची माहिती आहे. घुईखेड येथील शेतकऱ्यांना जाण्यासाठी राममंदिर ते हायवेपर्यंत पांदण रस्ता झाला नाही.यवतमाळ येथील पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता डी.जी. राठोड यांना आ. जगताप यांनी सदर कामांसदर्भात जाब विचारला. पण, ते आमदारांना समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाही. त्यामुळे आमदारांचा पारा चांगलाच भडकला होता. (प्रतिनिधी) कंत्राटदार अधिकाऱ्यांचे जावई लागतात का ?जलसंपदा विभागाने ज्या कंत्राटदाराला पांदण रस्त्यांच्या कामांच्या "वर्क आर्डर" दिल्या आहेत. जर कामे ८ महिन्यांत होत नसतील तर त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारावा. पण अधिकाऱ्यांनी आतापर्यंत साधे पत्रही कंत्राटदाराला दिले नाही. कंत्राटदार काय अधिकाऱ्यांचे जावई लागतात का, असा सवाल आ. जगताप यांनी केला.
पांदण रस्त्यांसाठी घुईखेडवासीयांचे उपोषण
By admin | Published: April 11, 2017 12:28 AM