एक ठार, एक गंभीर : मासोद येथील घटनाअमरावती : ऑटो-मिनीडोअरमध्ये झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला. शिरजगाव पोलीस ठाण्यांतर्गत मासोदजवळ शुक्रवारी सकाळी १0 वाजता ही घटना घडली. शोभा बापुराव राऊत (५६) असे मृताचे तर पंकज महादेव राऊत (३0) असे जखमीचे नाव आहे.कुर्हा येथील रहिवासी शोभा राऊत व पंकज राऊत यांच्यासह ७ जण शुक्रवारी सकाळी १0 वाजता ऑटोने चांदूरबाजार येथे दादाराव राऊत यांच्या मुलीच्या विवाह संमारंभाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी निघाले होते. मासोद गावाजवळ त्यांच्या ऑटोला विरुद्ध दिशेने येणार्या एम.एच.२७-४0४९ क्रमांकाच्या मिनीडोअर चालकाने जबर धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, यामध्ये ऑटोच्या दर्शनी भागाचा चुराडा होऊन शोभा व पंकज हे गंभीर जखमी झाले. हा अपघात पाहण्यासाठी अनेक बघ्यांची गर्दी उसळल्याने या मार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. घटनेची माहिती शिरजगाव पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जखमींना चांदुर बाजार येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु उपचारादरम्यान शोभा यांचा मृत्यु झाला. (प्रतिनिधी)रुग्णवाहिका बनली शो पीसजखमी शोभा व पंकज यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना एम.एच.४0 सी एल 0५२६ क्रमांकाच्या शासकीय रुग्णवाहिकेने जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले. जखमींना डॉक्टरांनी सलाईन देऊन जिल्हा सामान्य रुगाणालयात पाठविले नाही. हा हलगर्जीपणा पाहुन अतिदक्षता कक्षातील डॉक्टरांनी रुग्णवाहिकेत डॉक्टर महिलेला दम दिला.१0८ क्रमांकाची रुग्णवाहिका ही तत्काळ सेवा देण्यासाठी सेवेत आहे. या रुग्णवाहिकेत चांदूरबाजार येथून जखमींना आणण्यात आले. परंतु त्यांना कर्तव्यावर असणार्या डॉक्टरांनी आयव्ही (सलाईन) लावली नाही. रुग्णवाहिकेत रुग्णांना आणताना त्यांना आवश्यकतेनुसार सलाईन लावणे गरजेचे आहे. परिणामी यामध्ये एखाद्या रुग्णाचा जीव धोक्यात येऊ शकतो.-डॉ.ज्योत्स्ना किटुकले,जिल्हा सामान्य रुग्णालय
ऑटो-मिनीडोअरमध्ये भीषण अपघात
By admin | Published: June 07, 2014 12:43 AM