-------------
नानोरी फाट्यावरील अपघातप्रकरणी गुन्हा
ब्राह्मणवाडा थडी : चांदूर बाजार तालुक्यातील नानोरी फाट्यानजीक ३ जून रोजी विजय बबनराव विद्वांस (रा. रिद्धपूर) यांचा मुलगा भावेश हा दुचाकीने चांदूर बाजार येथे औषध आणण्याकरिता गेला होता. रस्त्यावर धोकादायक स्थितीत ठेवलेल्या एका नवीन ट्रॅक्टरला तो धडकला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी चांदूर बाजार पोलीस ठाण्यात अज्ञात चालकाविरुद्ध भादंविचे कलम २७९, ३३७, ३०४ अ व मोटर वाहन कायद्यान्वये मंगळवारी गुन्हा नोंदविला.
-------------
बेलोरा येथून चण्याचे पोते पळविले
बेलोरा : येथील भैैयासाहेब ऊर्फ मंगेश ठाकरे (४२) यांच्या घरातून २५ किलोचे चण्याचे पोते लंपास करण्यात आले. याप्रकरणी त्यांनी नरेश नागोराव डाहाके याच्यावर संशय व्यक्त केला. चांदूर बाजार पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला.
------------