परतवाडा : परतवाडा - अमरावती महामार्गावरील आठवडी बाजारनजीक भरधाव ट्रकने स्कुटीला धडक दिली. यात चार वर्षीय चिमुकल्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या वडिलांनी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना अखेरचा श्वास घेतला. ही घटना गुरुवारी दुपारी २ वाजता घडली. घटनेनंतर संतप्त नागरिकांनी वाहतूक पोलिसांसह ट्रक चालकाला चांगलाच चोप दिला. दर्शन दादाराव पंधरे (४) व दादाराव पंधरे (४०) रा. वैष्णवी अपार्टमेंट, देवमाळी, परतवाडा असे अपघातात मृत पावलेल्या बापलेकांची नावे आहेत. मृत दर्शनची आई उषा ऊईके (पंधरे) या अचलपूर कृषी विभागात दोन वर्षापासून कृषी सहाय्यक पदावर कार्यरत आहेत. दादाराव पंधरे यांनी पत्नी उषा हिला कार्यालायात सोडले व ते चिमुकल्या दर्शनला घेऊन एम.एच. २७/एजी ६४१२ क्रमांकाच्या स्कुटीने घराकडे निघाले. घरी जात असताना आठवडी बाजारनजीक भरधाव वेगाने येणाऱ्या एम.पी. १३/जी.ए.५१६९ क्रमांकाच्या ट्रकने त्यांच्या दुचाकीस जोरदार धडक दिली.बारा दिवसात चार ठार४परतवाडा शहरातील जयस्तंभ चौक ते बसस्थानक या महामार्गावर १२ दिवसात चौघांना ट्रकने चिरडले . रस्ता चौपदरीकरणाचे काम झाल्यावर आठवड्यात तुरळक असे सहा अपघात झालेत. गवंडी काम करणाऱ्या मजुरासह मोलमजुरी करणाऱ्या नारायणपूर येथील महिला व आज गुरुवारचा आठवडी बाजार असताना बापलेकाला नाहक जीव गमवावा लागला. चालक व पोलिसांना मारहाण४आठवडी बाजारात अपघात घडल्यानंतरही वाहतूक पोलीस कर्मचारी घटनास्थळी येत नसल्याचे पाहून संतप्त नागरिकांनी वाहतूक कर्मचाऱ्यांसह चालकाला चोप दिला. परिणामी घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. घटनेची फिर्याद श्याम बाळकृष्ण कोकाटे (३४) विद्यानगर कांडली यांनी परतवाडा पोलिसात दिल्यावर चालक मो. सादिक मो. सलीम रा. छोटा बाजार परतवाडा याचेवर २८९, ३०४ ए, ३३६ अन्वये गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली.
पिता-पुत्राला ट्रकने चिरडले
By admin | Published: April 22, 2016 1:16 AM