अनंत बोबडे।आॅनलाईन लोकमतयेवदा : मुलांच्या आशेत सात मुलींच्या जन्मदात्या बापाला त्याच मुलींनी खांदा व अग्नी देत वडिलांची अंतिम इच्छा पूर्ण केली. येवदा येथे मुलीच्या खांद्यावरून निघालेली कदाचित ही पहिलीच अंत्ययात्रा नव्या युगाची नांदी ठरली आहे. बापूराव रामचंद्र बोरेकर यांच्या वाट्याल मुलींच्या खांद्याचे भाग्य लाभले.येवदा येथील बापूराव रामचंद्र बोरेकर यांचे निधन झाले ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात सात मुली असल्याने अंत्यसंस्कार कुणी करायचे, असा प्रश्न त्यांच्या नातलगांना भेडसावत होता. यातच त्यांच्या मुलींनी पुढाकर घेतला. वडिलांनी मुलांच्या आशेत जरी आम्हा सात बहिणींना जन्म दिला असला तरी आमच्यात कधीच दुजाभाव केला नाही. सातही मुलींचे संगोपन आणि शिक्षण मोठ्या धैर्याने पार पाडले.अत्यल्प पगार असताना संगोपनात कुठलीही कसर न ठेवता शिक्षण पूर्ण केले, त्या नोकरी करतील येवढी हिमंत दिल्याचे मुलींनी सांगितले.बापूराव यांच्या तीन मुली नोकरी करतात. सर्व सातही मुली आपल्या संसारात रमल्या असताना त्यांनी कधीच वडिलांकडे दुर्लक्ष केले नाही. वडिलांना मुलाची कुठलीही कमतरता भासू मुलींनी वाटू दिली नाही. वडिलांच्या निधनानंतर सामाजिक प्रथेची कुठलीही तमा न बाळगता मुलिंनीच आक्टे धरून आपल्या वडिलांना खांदा दिला. वडिलांचे आगटे छोटी मुलगी शिल्पा चौधरी हिने, तर खांदा सुमन भालेकर, आशा वानखडे, उषा मोडोकार, निशा रायपुरे, मंगला नांदेकर, संगीता सुरळकर यांनी देऊन अंत्यसंस्कार पार पाडले. येवदा येथील या अभूतपूर्व घटनेचे साक्षीदार ठरलेल्या नागरिकांनी या घटनेची प्रशंसा केली आहे. मुलींनी आपल्या कृतीतून समाजासमोर नवा आदर्श स्थापित केल्याचे मत नोंदविले.
मुलींनीच दिला वडिलांना खांदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 11:55 PM
मुलांच्या आशेत सात मुलींच्या जन्मदात्या बापाला त्याच मुलींनी खांदा व अग्नी देत वडिलांची अंतिम इच्छा पूर्ण केली.
ठळक मुद्देसमाजासमोर ठेवला आदर्श : सात बहिणी, आगटेही पकडले अन् मुखाग्नीही दिला