शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

मुलाची वरात परतण्यापूर्वीच पित्याचा ईहत्याग!

By admin | Published: February 10, 2017 12:05 AM

कर्करोगाशी झुंजणाऱ्या पित्याची अंतिम ईच्छा म्हणून ‘त्याने’ तत्काळ विवाह उरकण्याचा निर्णय घेतला.

संदीप मानकर दर्यापूरकर्करोगाशी झुंजणाऱ्या पित्याची अंतिम ईच्छा म्हणून ‘त्याने’ तत्काळ विवाह उरकण्याचा निर्णय घेतला. सारे काही ठरल्याप्रमाणे पारही पडले. पण, सुनमुख पाहण्याची लालसा डोळ्यांत ठेऊनच ‘त्या’ पित्याने प्राणत्याग केला आणि पंचक्रोशीतील नागरिक हळहळले. मुलाची वरात घरी पोहोचण्यापूर्वीच पित्याचा मृत्यू झाल्याने नवरीच्या गृहप्रवेशाऐवजी घरधन्याच्या अंत्यसंस्काराची तयारी करण्याची वेळ तराळ कुटुंबावर आली. म्हणतात ना, ‘कोण दिवस येई कसा कोण जाणतो’ असाच काहीसा प्रकार तराळ कुटुंबासमवेत घडला. तालुक्यातील सामदा येथील सदन कास्तकार अनंतराव तराळ (५५) यांना मागील २० वर्षांपासून कर्करोेग झाला होता. ते औषधोपचार आणि ईच्छाशक्तीच्या बळावर तग धरून होते. मात्र, मागील काही दिवसांपासून त्यांचा आजार जास्तच बळावला होता. एकुलता एक मुलगा मेहेरदीप याचे दोनाचे चार हात आपल्या डोळ्यांदेखत व्हावे, अशी त्यांची इच्छा होती. पित्याची दिवसेंदिवस ढासळत चाललेली प्रकृती पाहून मेहेरदीपने तातडीने विवाह करण्याचा निर्णय घेतला. ठरल्याप्रमाणे गुरुवारी निवडक नातेवाईकांसोबत तो खामगाव येथे वधुमंडपी पोहोचला. दुपारच्या मुहूर्ताला विवाह पार पडला आणि लगेच पित्याच्या निधनाची दु:खद वार्ता त्यांच्या कानी पडली. एकीकडे विवाहाचा आनंद व दुसरीकडे पित्याच्या निधनाचे दु:ख असा विचित्र प्रसंग मेहेरदीपसह तराळ कुटुंबियांवर ओढवला. वरात घरी परतताच अनंतराव तराळ यांची अंत्ययात्रा निघाली. कुटुंबियांच्या आक्रोशाने वातावरण गहिवरले होते. दर्यापुरातील घटना : नव्या नवरीच्या गृहप्रवेशाऐवजी घरधन्याच्या अंत्यसंस्काराची वेळसूनमुख पाहण्याची इच्छा अपूर्णच ४दर्यापूर तालुक्यातील हसतमुख व्यक्तिमत्व अनंतराव तराळ यांना घशाचा कर्करोग होता. तेव्हा त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. योग्य औषधोपचार व प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर त्यांनी बरीच वर्षे तग धरला. परंतु मुलाचे लग्न झाल्यानंतर सुनमुख पाहण्यापूर्वीच त्यांनी जगाचा निरोेप घेतला. यामुळे परिसरातील नागरिकही हळहळ व्यक्त करीत होते. अंत्ययात्रा निघणार असल्याने नववधुला शेजारच्या घरात काही वेळ थांबविण्यात आले होते.