शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

शंभर कोटींची एफडी; प्रशासनाला विचारला जाब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 1:16 AM

जिल्हा परिषदेला विविध विकासकामे, योजना आणि वेतनाचा सुमारे १६० कोटी रुपयांची एफडी जिल्हा बँकेत न करता प्रशासनाने पदाधिकाऱ्यांना अंधारात ठेवत राष्ट्रीयीकृत बॅकेत केल्याने या मुद्यावर गुरुवारी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत प्रशासनाला काँग्रेसचे गटनेता बबलू देशमुख यांनी धारेवर धरत जाब विचारला.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : स्थायी समिती सभेत गाजला मुद्दा, नुकसानाच्या वसुलीचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा परिषदेला विविध विकासकामे, योजना आणि वेतनाचा सुमारे १६० कोटी रुपयांची एफडी जिल्हा बँकेत न करता प्रशासनाने पदाधिकाऱ्यांना अंधारात ठेवत राष्ट्रीयीकृत बॅकेत केल्याने या मुद्यावर गुरुवारी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत प्रशासनाला काँग्रेसचे गटनेता बबलू देशमुख यांनी धारेवर धरत जाब विचारला. यामुळे सभागृहाचे वातावरण चांगलेच तापले होते.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकºयांची बँक आहे. विशेष म्हणजे, विदर्भात एक नंबर आहे. त्यामुळेच मागील कित्येक वर्षापासून जिल्हा परिषदेला विकास कामे, योजना आणि वेतनासाठी आर्थिक वर्षात प्राप्त होणारा शासनाचा कोट्यवधीचा निधी आतापर्यत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ठेव म्हणून ठेवला जात आहे. यातूनच जिल्हा परिषदेचे सर्व आर्थिक व्यवहार सुरू असताना मागील काही दिवसांपूर्वी पदाधिकाºयांना अंधारात ठेवून झेडपीच्या वित्त विभागाने सीईओंचा आदेश पुढे करीत जवळपास १६० कोटींचा निधीची राष्ट्रीयीकृत बँकेत एफडी केली आहे. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेतील २५ कोटी व एसबीआय बँकेतील ७५ कोटी रूपयांचा यात समावेश आहे. मात्र, हा निधी जवळपास १६० कोटी रुपयांचा असल्याचे बबलू देशमुख यांनी सभागृहाचे निदर्शनास आणून दिले. जिल्हा बँकेत सुरळीत व्यवहार सुरू आहेत. अशातच सर्वाधिक व्याजदर जिल्हा बँकेचा असताना, अल्प प्रमाणात व्याज देणाºया राष्ट्रीयीकृत बँकेत कुणाला विचारून १६० कोटीची एफडी केली आणि यात वित्त अधिकारी रवींद्र येवले यांचा हेतू काय, असा जाब विचारत काँग्रेसचे गटनेते बबलू देशमुख यांनी प्रशासनाला जाब विचारला. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही सदर ठेव रकमेवर सर्वाधिक व्याज देत आहे. मात्र, याचा काहीही विचार न करता कमी व्याजदर असलेल्या राष्ट्रीयीकृत बँकेत ही ठेव ठेवल्याने जिल्हा परिषदेला मिळणाºया व्याजाच्या रकमेचे नुकसान होणार आहे. कॅफोकडून या नुकसानाची रक्कम वसूल करण्यात यावी, असा ठराव स्थायी समितीत पारित करण्यात आला. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील गावंडगाव येथे काही महिन्यांपूर्वी ग्रामपंचायतीमार्फत जनसुविधा व शौचालय तसेच घरकुलाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याने येथील नागरिकांनी उपोषण सुरू केले होते. त्यावेळी डेप्युटी सीईओ यांनी उपोषणस्थळी भेट देऊन दोषींवर कारवाईचे आश्वासन दिले होते. चौकशी अहवालात ग्रामसेवक व शाखा अभियंता दोषसिद्ध असताना कारवाई समज देण्यावर थांबवली. याबाबत बळवंत वानखडे यांनी पंचायत विभागाच्या डेप्युटी सीईओंना जाब विचारला. सीईओंनी यावर खातेप्रमुखाचा खुलासा मागवून पुढील कारवाईचे आश्वासन दिले. सभेला उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, सभापती जयंत देशमुख, वनिता पाल, सुशीला कुकडे, बाळासाहेब हिंगणीकर, प्रियंका दगडकर, रवींद्र मुंदे, सुनील डिके, सीईओ विनय ठमके, डेप्युटी सीईओ नारायण सानप, दिलीप मानकर, माया वानखडे, प्रशांत थोरात, प्रशांत गावंडे, प्रमोद तलवारे,कॅफो दतात्रय फिसके, विजय राहाटे आदी उपस्थित होते.या मुद्यावर होणार चौकशीजिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागातील आॅनलाइन वेतनात बोगस नावे टाकून ६२ लाख रुपयांचा अपहार करणाºया दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी सखोल चौकशीचे आदेश अध्यक्ष नितीन गोंडाणे यांनी दिले आहेत. यासोबतच धारणी तालुक्यातील बैरागड प्राथमिक आरोग्य केंद्रात तृतीयश्रेणी कर्मचाºयाने ओपीडीचा पैसा स्वत: वापरला. याप्रकरणी दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी महेंद्र गैलवार यांनी केली. नांदगाव तालुक्यातील अडगाव येथील रोहयोतील अनियमिततेप्रकरणी कारवाईची मागणी सुहासिनी ढेपे यांनी केली. यावर कारवाईचे आश्वासन पिठासीन सभापतींनी दिले.

टॅग्स :bankबँक