अमरावती : जिल्ह्यात कोरोनाचा झपाट्याने फैलाव होत असतानाच दुसरीकडे डेंग्यूसदृश तापाचे पुन्हा डोके वर काढले आहे. शासकीय रुग्णालयाचे खासगी रुग्णालयांमध्ये अशा रुग्णांची संख्या वाढत असल्याने विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे. जिल्ह्यात वातावरणातील बदलांचा डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे डेंगूसदृश्य आजारांमध्ये वाढ होत आहे. कोरोना काळात अत्यल्प रुग्णसंख्या असलेली ओपीडीता वाढत आहे. त्यामुळे डेग्युसदूष्य आजारामध्ये वाढ होत असल्याचे सर्व्हेक्षणाअंती निदर्शनास येत आहे. त्यामुळे आजारापासून बचाव करण्यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे.
बॉक्स
डेंग्यूची लक्षणे
एकदम जोराचा ताप चढणे
डोक्याचा पुढचा भाग अतिशय दुखणे
डोळ्यांच्या मागील भागात वेदना जी डोळ्याच्या हालचाली सोबत अधिक होते.
स्नायू आणि सांध्यांमध्ये वेदना
चव आणि भूक नष्ट होणे
छांती आणि वरील अवयावर गोवरा सारखे पूरक येणे,
त्वचेवर व्रण उठणे.
बॉक्स
अशी घ्यावयाची काळजी
सर्दी खोकला तापाची लक्षणे आढल्यास रूग्णांनी तत्काळ डॉक्टराकडे जावे,
डॉक्टरांच्या सल्याने आवश्यक चाचण्या करून घ्याव्यात
खाजगी डॉक्टरांनी डेग्युची रूग्णांची माहिती देणे अनिवार्य
कोट
कोट
सर्दी खोकला तापाची कुठलीही लक्षणे आढळल्यास त्यांनी तात्काळ डॉक्टरांकडे जावे डॉक्टरांच्या सल्याने आवश्यक चाचण्या कराव्यात डॉक्टरांनीही डेंग्यूच्या रुग्णांची माहिती देणे अनिवार्य आहे.
डॉ.शरद जोगी
जिल्हा हिवताप अधिकारी