शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
2
"मुख्यमंत्री नाही, पण ५ मिनिटांसाठी तरी पंतप्रधान होणार", महादेव जानकरांनी व्यक्त केला विश्वास 
3
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
4
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा
5
Basmath Vidhan Sabha 2024: दोन राष्ट्रवादीत लढत! जयप्रकाश दांडेगावकर vs राजू नवघरे रिंगणात... गुरूच्या विरोधात शिष्य!
6
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
7
शाळांच्या सुट्टीबद्दल शिक्षण आयुक्तालय आणि महापालिकेचा परस्परविरोधी निर्णय
8
'मुन्नाभाई MBBS'मधला स्वामी आता दिसतो खूपच वेगळा, लेटेस्ट फोटो पाहून चाहते झाले अवाक्
9
Fact Check: 'जर्सी नं. 7' धोनीच्या सन्मानार्थ RBI ७ रुपयांचं नाणं आणणार?; व्हायरल दाव्यामागील सत्य वेगळंच
10
Maharashtra Election 2024 Live Updates: महाराष्ट्राची निवडणूक ही विचारसरणीची निवडणूक- राहुल गांधी
11
खासगी विमान, ३० हून अधिक लक्झरी कार्स, परदेशात मालमत्ता; नायजेरियाच्या राष्ट्रध्यक्षांची संपत्ती किती?
12
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
13
ऑनलाइन तेल पडले महागात! अमेरिकेत मुलाची केस गळती, वाशीतल्या वडिलांना लाखोंचा गंडा
14
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
15
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
16
Sankashti Chaturthi 2024: तुमचा आज संकष्टीचा उपास आहे? जाणून घ्या चंद्रोदयाची वेळ आणि नियम!
17
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
19
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 

विद्यापीठात बहि:शाल विद्यार्थ्यांची स्वाक्षरीसाठी फरफट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 10:20 PM

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या बहि:शाल विद्यार्थ्यांची परीक्षा अर्जावर स्वाक्षरीसाठी फरफट होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. विभागप्रमुखांकडे पाच ते सहा येरझारा मारल्यानंतही परीक्षा अर्जावर स्वाक्षरी मिळत नाही. त्यामुळे बहि:शाल विद्यार्थ्यांनी व्यथा कुणाकडे मांडावी, असा सवाल उपस्थित होत आहे.

ठळक मुद्देपरीक्षा अर्जावर स्वाक्षरी मिळेना : अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या बहि:शाल विद्यार्थ्यांची परीक्षा अर्जावर स्वाक्षरीसाठी फरफट होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. विभागप्रमुखांकडे पाच ते सहा येरझारा मारल्यानंतही परीक्षा अर्जावर स्वाक्षरी मिळत नाही. त्यामुळे बहि:शाल विद्यार्थ्यांनी व्यथा कुणाकडे मांडावी, असा सवाल उपस्थित होत आहे.नागपूर येथील केंद्रीय विद्यालयाचे सहायक प्राध्यापक तुषार नागदिवे हे सोमवारी अमरावती विद्यापीठात एम.ए. राज्यशास्त्र भाग- २ चा बहि:शाल परीक्षेचा अर्ज सादर करण्यासाठी आले होते. बहि:शाल परीक्षा देणाºया विद्यार्थ्यांच्या परीक्षा अर्जावर प्राधिकृत अधिकाºयांची स्वाक्षरी अनिवार्य करण्यात आली आहे. स्वाक्षरी नसल्यास बहि:शाल विद्यार्थ्यांचा परीक्षा अर्ज नामंजूर होतो. तुषार नागदिवे हे सोमवारी विद्यापीठात पाच ते सहा विभागप्रमुखांकडे गेले. काहींनी चक्क नकार दिला, तर काहींनी दुसºया विभागाकडे बोट दाखविले. अखेर त्यांनी विद्यापीठ जनसंपर्क कार्यालय गाठले. त्यांनी मार्गदर्शन करण्याची विनंती जनसंपर्क अधिकारी विलास नांदूरकर यांच्याकडे केली. बहि:शाल विद्यार्थ्यांच्या परीक्षा अर्जावर स्वाक्षरीसाठी प्राधिकृत अधिकाºयांची यादी जनसंपर्क कार्यालयाच्या दर्शनी भागात असली तरी यापैकी बहुतांश मोबाईल उचलत नव्हते, असा अनुभव तुषार नागदिवे यांनी मांडला. विद्यापीठाचे वर्ग- १ किंवा वर्ग- २ च्या अधिकाºयांना स्वाक्षरीचे अधिकार प्रदान केल्यास विद्यार्थ्यांची पायपीट थांबेल, असा सूर या प्रकरणात उमटू लागला आहे.परीक्षा अर्जावर यांची हवी स्वाक्षरीविद्यापीठात बहि:शाल विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज सादर करताना प्राधिकृत अधिकाºयांची स्वाक्षरी अनिवार्य केली आहे. विद्यापीठ कायद्यानुसार सिनेट सभेने स्वाक्षरीसाठी काही पदे निश्चित केली आहे. यात न्यायाधीश, प्राचार्य, अधिसभा सदस्य, विद्वत परिषदेचे सदस्य, महाविद्यालये अथवा विद्यापीठ विभागाचे शिक्षकांचा समावेश आहे.बहि:शाल विद्यार्थ्यांच्या स्वाक्षरीसाठी विद्यापीठात जुन्या अधिसूचेनुसार कार्यवाही सुरू आहे. यासंदर्भात काही विद्यार्थ्यांच्या तक्रारी असून, लवकरच त्याविषयी तोडगा काढून विद्यार्थ्यांना सर्वसमावेशक न्याय दिला जाईल.- राजेश जयपूरकरप्र-कुलगुरू, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ.