मार्गदर्शक सूचना : मंडळाकडे रक्कम जमा करण्याचे आदेशअमरावती : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र, अर्थात दहावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्याचे परीक्षा शुल्क संबंधित शाळांनी प्रचलित चलनासह डीडी तसेच आॅनलाईन पध्दतीने भरूण विद्यार्थ्याची माहिती विभागीय मंडळात ११ फेब्रुवारीपर्यंत जमा करण्याच्या सूचना शिक्षण मंडळाने दिल्या आहेत.विद्यार्थ्यांचे आवेदनपत्रे ४ नोव्हेंबर ते ५ डिसेंबरपर्यंत २०१६ पर्यत शुल्कासह व ६ ते १३ डिसेबरपर्यंत विलंब, शुल्कासह आॅनलाईन पध्दतीने स्वीकारण्यात आलेली आहेत. मंडळातर्फे नुकतीन विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरूण घेण्यात आली. शाळांनी विद्यार्थ्याचे परीक्षा शुल्क प्रचलित चलनासह रोखीने भरू शकत असतील तर चलनाव्दारे बँकेत रक्कम भरून विद्यार्थ्याची यादी विभागीय मंडळात जमा करावी, यासह रोखीने रक्कम भरणे शक्य नसेल तर शाळांनी विभागीय मंडळाच्या सचिवांच्या नावाने धनादेश काढून चलन व विद्यार्थ्यांची यादी जमा करावयाची आहे. त्यामुळे जिल्ह्यासह विभागातील शाळांनी दखल घ्यावी, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. आॅनलाईन शुल्क भरण्याच्या सुविधेमुळे परीक्षार्थ्याची वेळ वाचणार आहे? तसेच पालक वर्गालादेखील सुविधा मिळेल यंदापासून राबवल्या जाणाऱ्या या उपक्रमाला विद्यार्थ्याचा किती प्रतिसाद मिळतो हे लवकरच स्पष्ट होणार आहे. (प्रतिनिधी)रक्कम जमा करावीज्या शाळांनी आरटीजीएस तसेच एनईएफटीव्दारे रक्कम जमा करावयाची आहे. त्यांनी विभागीय मंडळाच्या खात्यावर रक्कम जमा करावी. तसेच बँकेचा युटीआर क्रमांक नमूद करून चलनाची प्रत व विद्यार्थ्याची यादी मंडळात जमा कराव्यात अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
इयत्ता दहावीसाठी शुल्क भरणा आॅनलॉईन
By admin | Published: February 06, 2017 12:08 AM