शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

महिला पोलीस अधिकाऱ्याची आठ महिन्याच्या चिमुकल्यासह कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2021 4:10 AM

संडे पाॅझिटिव्ह स्टोरी : १५ दिवसाच्या उपचारनंतर ठरल्या कोरोना योद्धा (दोन फोटो आहेत.) अमरावती : लोकांना कोरोना होऊ नये ...

संडे पाॅझिटिव्ह स्टोरी : १५ दिवसाच्या उपचारनंतर ठरल्या कोरोना योद्धा (दोन फोटो आहेत.)

अमरावती : लोकांना कोरोना होऊ नये म्हणून त्यांना घराबाहेर पडू न देणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्याने स्वत: कोरोना झाल्यानंतर तेवढ्याच धीरोदात्तपणे या विषाणू संक्रमणाशी सामना केला. त्यांच्या अवघ्या आठ महिन्याच्या कोरोना लक्षणे असलेल्या चिमुकल्यालाही यातून त्यांनी सुखरूप बाहेर काढले. एवढेच नव्हे तर १५ दिवसांचा उपचार व स्वास्थ्यलाभानंतर त्या कर्तव्यावर रुजू झाल्या. पतीची खंबीर साथ लाभल्याने ही लढाई यशस्वी केली, अशी प्रतिक्रिया या कोरोनायोद्धा अधिकाऱ्याने दिली आहे.

कोरोनाकाळात पोलिसांचे नियमित कामकाज सुरू होते. हे करीत असतानाच सहायक पोलीस निरीक्षक सोनाली मेश्राम यांना ताप आला. डोके दुखायला लागले. त्यांना कोरोनाची लक्षणे जाणवायला लागली. त्यामुळे त्यांना चाचणी करुन घेतली. दोन दिवसांत अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांना डॉक्टरांनी गृहविलगीकरणात राहण्याचा सल्ला दिला व औषधोपचार सुरू केला. मात्र, अवघ्या आठ महिन्यांचाच मुलगा असल्याने त्याला सोडून राहता येणार नव्हते. स्तनपानाद्वारे त्याचे उदरभरण महत्त्वाचे होते. या प्रक्रियेत त्याला तर कोरोना होणार नाही ना, ही धास्ती आईच्या मनात होती. अखेर दोन दिवसांतच त्यालासुद्धा कोरोनाची लक्षणे जाणवयाला लागली. त्याला दिवसभरात ६० ते ७० शिंका आला. बाळालासुद्धा कोरोनाचे निदान खासगी डॉक्टरांकडे केलेल्या चाचणीतून झाले. मात्र, आठ महिन्यांच्या बाळाची कोरोना चाचणी कशी करावी, हा प्रश्न आई-समोर होता. त्याला अखेर कोरोनाचीच टिट्रमेंट देण्यात आली. त्यानंतर महावितरणमध्ये अभियंता असलेले सोनाली यांचे पती सचिन मेश्राम यांचीसुद्धा चाचणी करण्यात आली. त्यांची चाचणी निगेटिव्ह आली. ते सोनाली व मुलाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यांनी या काळात हिंमत दिल्याचे सोनाली सांगतात. १५ दिवस उपचार घेतल्यानंतर त्या १६ मे रोजी कर्तव्यावर रुजू झाल्या. फ्रेजरपुरा ठाण्यात अन्य महिला अधिकारी नसल्याने त्यांनी हा निर्णय घेतला. कोरोनावर मात केली म्हणून फ्रेजरपुरा ठाण्यातील वरिष्ठांनी व कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.

---------------

जेव्हा कोरोना पॉझिटिव्ह निघाले तेव्हा बाळाची चिंता होती. तो आईशिवाय राहू शकत नव्हता. मास्कसुद्धा कायम घालून घालृू शकत नव्हता. हा काळ भाविनकदृष्ट्या फार कठीण होता.

- सोनाली मेश्राम, सहायक पोलीस निरीक्षक, फ्रेजरपुरा पोलीस ठाणे