-------------------
माहेरहून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ
परतवाडा : दोन वर्षे संसार केल्यानंतर माहेरहून पैसे आणण्यासाठी महिलेचा शारीरिक व मानसिक करण्यात आला. महिलेच्या तक्रारीवरून परतवाडा पोलिसांनी सैयद शामीर हुसेन सैयद फैयाज हुसेन (३२, रा. राशहानूर कॉलनी), शकीर हुसेन सैयद फैयाज हुसैन व एका महिलेविरुद्ध ३ जुलै रोजी गुन्हा नोंदविला.
-------------
पैशांच्या वादातून काठीने मारहाण
अचलपूर : लग्नात भेट म्हणून दिलेल्या फ्रीजचे पैसे मागितल्यावरून वाद करून शिवीगाळ केली व लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहाण केल्याची घटना २ जुलै रोजी घडली. विजय नामदेव लाखोडे यांच्या तक्रारीवरून सुरेश नामदेव लाखोडे (५८), कुणाल सुरेश लाखोडे (३१, रा. विठ्ठलवाडी, कांडली) विरुद्ध परतवाडा पोलिसांनी ३ जुलै रोजी गुन्हा नोंदविला.
--------------------------
दुचाकीस्वाराची घंटागाडीला धडकवरूड : विरुद्ध दिशेने भरधाव दुचाकी चालवून घंटागाडीला धडक दिल्याची घटना ३ जुलै रोजी कार्यालयासमोर घडली. पंकज अरुण गणोरकर (३६, रा. राजुरा नाका) याच्या तक्रारीवरून वरूड पोलिसांनी अज्ञात दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा नोंदविला.
----------------
क्षुल्लक कारणावरून डोक्यावर मारहाण
धारणी : घरावर दगड मारल्याच्या कारणावरून संगनमताने हातावर, डोक्यावर व कमरेवर काठीने मारून जखमी करण्यात आले. ही घटना २ जुलै रोजी रात्री ९ वाजता दरम्यान घडली. रवि मगन पटोरकर (२५, रा. आकी) यांच्या तक्रारीवरून धारणी पोलिसांनी विकास शरद धांडे, मंगल सानू भिलावेकर (रा. आकी) विरुद्ध गुन्हा नोंदविला.
-----------
दारू पिण्याकरिता पैसे न दिल्याने शिवीगाळ
धारणी : दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली असता, नकार दिल्याने शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना २ जुलै रोजी सुसर्दा येथे घडली. महिलेच्या तक्रारीवरून धारणी पोलिसांनी राजेश कालुसिंग पवार, बेबीबाई कालुसिंग पवार ( रा. सुसर्दा) विरुद्ध धारणी पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
---------------
लग्नात आंदण न आल्यावरून विवाहितेचा छळ
नांदगाव खंडेश्वर : लग्नात फ्रीज, सोफा, कूलर आले नसल्याचे टोमणे मारत माहेरहून पैसे आणण्यासाठी शारीरिक व मानसिक छळ केल्याची तक्रार नांदगाव पोलिसांत दिली. त्यावरून पोलिसांनी नागेश चंद्रकांत गणवीर, स्वाती अतुल गणवीर, अतुल चंद्रकांत गणवीर, चंद्रकांत नामदेव गणवीर, लता चंद्रकांत गणवीर, स्मिता संग्राम मेश्राम, संग्राम तु. मेश्राम (सर्व रा. अमरावती) विरुद्ध गुन्हा नोंदविला.