लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मध्यरात्री होत असलेल्या रेतीच्या अवैध वाहतुकीची मादी बिबट बळी ठरली आहे. पोहरा मार्गावर रेतीच्या ट्रकची धडक लागल्याने बिबटाचा ठार झाल्याचा दावा करीत वनविभागाने अज्ञात ट्रकचालकाविरुद्ध वनगुन्ह्याची नोंद केली.गेल्या काही वर्षांत रेतीची अवैध वाहतूक होत आहे. त्यावर अंकुश ठेवण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न चालविले होते. मात्र, पुन्हा रेती तस्करांनी तोंड वर काढले. दरम्यान, बिबट मृत्यूच्या अनुषंगाने जंगलातील मार्गावर गस्तीसाठी वनकर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी वाइल्ड लाइफ अवेअरनेस, रिसर्च अॅन्ड रेस्क्यू संस्थेचे अध्यक्ष नीलेश कंचनपुरे यांनी उपवनसरंक्षक मिणा यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.पोहरा मार्गावर पांढरे पट्टेअपघाताच्या अनुषंगाने उपवनसरंक्षक हेमंतकुमार मिणा यांनी बुधवारी पोहरा मार्गाची पाहणी केली. यावेळी वनपाल विनोद कोहळेंसह अन्य वनकर्मचारी उपस्थित होते. पोहरा रोडवरील घटनास्थळी गतिरोधक द्यावे, यासाठी वनविभागाने साबांविला पत्र दिले होते. मात्र, गतिरोधक बसविण्यात आले नाही. बुधवारी मिना यांनी भेट देऊन रस्त्याची पाहणी केली आणि अपघातप्रवण स्थळी पांढरे पट्टे मारण्याचे निर्देश वनकर्मचाºयांना दिले.महसूल विभाग करते तरी काय?शहरातील चांदूर रेल्वे मार्गावरून सर्रासपणे मध्यरात्री रेतीची अवैध वाहतूक केली जाते. मात्र, महसूल विभागाचे अधिकारी निद्रिस्त आहेत. महसूल विभाग करते तरी काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मादी बिबट ठरली अवैध रेती वाहतुकीचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2018 10:23 PM
मध्यरात्री होत असलेल्या रेतीच्या अवैध वाहतुकीची मादी बिबट बळी ठरली आहे. पोहरा मार्गावर रेतीच्या ट्रकची धडक लागल्याने बिबटाचा ठार झाल्याचा दावा करीत वनविभागाने अज्ञात ट्रकचालकाविरुद्ध वनगुन्ह्याची नोंद केली.
ठळक मुद्देअभय कुणाचे : मध्यरात्री जंगल मार्गावर वाहने