शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

आठ कृषी सेवा केंद्रांचे खत परवाने निलंबित; खताऐवजी मातीची विक्री

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 11:19 AM

बोगस खतविक्री अंगलट : एसएओंची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : रासायनिक खतविक्रीमध्ये अनियमितता केल्याप्रकरणी आठ कृषी केंद्रांचे खत परवाने वर्षभरासाठी निलंबित करण्यात आले. ही कारवाई जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा परवाना अधिकारी राहुल सातपुते यांनी बुधवारी केली, यापूर्वी मुख्य वितरकाचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे, तर पाच कृषी केंद्र चालकांना ताकीद देण्यात आली आहे.

जिल्ह्यात रासायनिक खतांऐवजी ५० लाखांची माती विकण्याचा भंडाफोड कृषी विभागाने केला होता. संबंधित रामा फर्टिकेम खत कंपनीकडे आयएफएमएस प्रणालीवर आयडी क्रमांक नसतानासुद्धा मंदार अॅग्रो सर्व्हिसेस या मुख्य वितरकाद्वारा सहा तालुक्यांतील १२ किरकोळ विक्रेत्यांना खतांची विक्री करण्यात आली. त्यामुळे एसएओ राहुल सातपुते यांनी या विक्रेत्याचा खत परवाना यापूर्वी कायमस्वरूपी रद्द केला आहे. 

या खताची पॉस मशीनशिवाय विक्री करणाऱ्या १२ कृषी केंद्रांना नोटीस बजावण्यात आली होती. सुनावणीदरम्यान रामा फर्टिकेम या कंपनीचे खत 'ओ' फार्म परवान्यात समाविष्ट नाही व या खताची विक्री संबंधित कृषी केंद्रातून पॉस मशीनशिवाय झाल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने खताची रक्कम पाच केंद्र चालकांनी परत केली. त्यामुळे या केंद्रांना ताकीद देण्यात आली, तर अन्य आठ केंद्रांचे परवाने वर्षभरासाठी निलंबित करण्यात आले आहेत.

काय आहे खताऐवजी माती विक्रीचे प्रकरण? पुणे येथील रामा फर्टिकम या खत कंपनीद्वारा जिल्ह्यात किमान ५० लाख रुपये किमतीचे डीएपी व एनपीकेऐवजी माती विक्री करण्यात आली. कृषी उपसंचालक उदय आगरकर व जिल्हा कृषी अधिकारी अजय तळेगावकर यांनी घेतलेले खतांचे नमुने अप्रमाणित आल्यानंतर या कंपनीविरोधात शहर कोतवालीत एफआयआर नोंदविण्यात आला आहे.

या केंद्रांचे परवाने निलंबित तिवसा तालुक्यात नीलेश कृषी केंद्र (मारडा), भामकर कृषी केंद्र (शिवणगाव), गणेश कृषी केंद्र (तिवसा), सावरकर कृषी केंद्र (तिवसा), याशिवाय खंडेश्वर कृषी केंद्र (नांदगाव खं), शुभम कृषी केंद्र (मंगरूळ च.), अमोल कृषी केंद्र (रिद्धपूर) व राऊत कृषी केंद्र (चांदूर रेल्वे) या केंद्रांचा खत विक्री परवाना १२ महिन्यांसाठी निलंबित करण्यात आला.

टॅग्स :AmravatiअमरावतीFertilizerखते