शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

शासनमान्य कंपनीच्या खतांचे नमुने फेल, कारवाई केव्हा ?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2024 12:12 PM

शेतकऱ्यांची फसवणूक : साठा विक्री बंद, मंगरुळ दस्तगीर येथील प्रकार

गजानन मोहोड लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : पुण्याच्या परवानाप्राप्त कंपनीद्वारे बोगस खत विकल्याचा प्रकार महिनाभरापूर्वी उघडकीस आला होता. आता पुन्हा कृषी विभागाचाच परवाना असलेल्या सातारा जिल्ह्यातील एका कंपनीच्या रासायनिक खतांचे नमुने अप्रमाणित आले आहेत. धामणगाव रेल्वे तालुक्यातील मंगरुळ दस्तगीर येथील एका कृषी केंद्रातून ही खते विकली गेली. या कंपनीच्या १७८ पोत्यांचा साठा विक्री बंद करण्यात आला आहे. यामध्ये शेतकऱ्यांची लाखो रुपयांनी फसवणूक झाल्याचे वास्तव आहे.

कृषी उपसंचालक उज्ज्वल आगरकर, जिल्हा कृषी अधिकारी अजय तळेगावकर व धामणगाव तालुक्याचे कृषी अधिकारी यांनी काही दिवसांपूर्वी मंगरुळ दस्तगीर येथील बुटले सेवा केंद्रातील रासायनिक खतांचे नमुने घेतले होते. त्यानंतर एसएओ राहुल सातपुते यांनी पथकासह पाहणी व चौकशी केली होती. दरम्यान, या नमुन्यांचा अहवाल अप्रमाणित आल्याने डीएपी, एनपीके १०:२६:२६, एनपीके १४:०७:१४ व २४:२४:०० या खतांचा उर्वरित साठा विक्री बंद करण्याचे आदेश यापूर्वीच दिले आहेत. ग्रीनफिल्ड अॅग्रीकेम इंडस्ट्रीज, तरडगाव, ता-फलटन, जि-सातारा व या कंपनीच्या संबंधित जार्डन कंपनीचे ही खते आहेत. मंगरुळसह परिसरातील गावांमध्ये या खतांची दीड हजारांवर पोत्यांची विक्री झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. या अप्रमाणित खतांमुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे व पिकांचेही नुकसान झाल्याचे वास्तव आहे

वर्धा जिल्ह्यातून झाला खतांचा पुरवठा वर्धा जिल्ह्यातून तसेच पुलगाव येथून संबंधित खतांचा पुरवठा झालेला आहे. जिल्ह्यात फक्त मंगरुळ दस्तगीर येथील याच केंद्राला पुरवठा झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली. यवतमाळ जिल्ह्यातही या खतांचा पुरवठा झाल्याची शक्यता आहे. शिवाय हे खत पॉसमशीन शिवाय विक्री करण्यात आलेले आहे. कृषी विभागाद्वारा यावर काय कारवाई होते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे

कृषी संचालकांना मागितले मार्गदर्शन रासायनिक खतांचे नमुने अप्रमाणित आलेल्या ग्रीनफिल्ड कंपनीचे लायसन्स, आयएफएमएस कोड, एक्पोर्ट-इपोर्ट याशिवाय अन्य कागदपत्रे ओके असल्याचे कृषी विभागाने सांगितले. मात्र नमुने अप्रमाणित आल्याने परवान्यावर कारवाई तसेच आवश्यक कारवाई करण्याबाबत राज्याचे कृषी संचालक यांच्याकडे मार्गदर्शन मागितल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले.

ग्रीनफिल्ड अॅग्रीकेम अन् जॉर्डन कंपनीचे खत "मंगरुळ दस्तगीर येथील कृषी केंद्रातून घेतलेले ग्रीनफील्ड व जार्डन या कंपनीच्या रासायनिक खतांचे नमुने अप्रमाणित आले आहेत. कंपनीचे कागदपत्रे ओके असल्याने आवश्यक कारवाई करण्याबाबत कृषी संचालक यांना मार्गदर्शन मागितले आहे. याबाबत सूचना मिळाल्यास त्वरीत कारवाई करण्यात येईल."- राहुल सातपुते जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी 

टॅग्स :FertilizerखतेFarmerशेतकरीfarmingशेतीAmravatiअमरावती