शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
3
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
4
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
5
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
6
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
7
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
9
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
10
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
11
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
12
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
13
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
14
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
16
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
17
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
18
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
19
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
20
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!

भीषण आग 400 विद्यार्थ्यांचे ‘रेस्क्यू’ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2022 5:00 AM

तीन मजली शिवाजी कॉम्प्लेक्समध्ये फर्निचरसह वरच्या मजल्यावर काही कोचिंग क्लास आहेत. शुक्रवारी दुपारी दुसऱ्या मजल्यावरील डॉ. प्रकाश विश्वकर्मा यांच्या होमिओपॅथी क्लिनिकला अचानक आग लागली आणि एकच हाहाकार उडाला. क्लिनिकला लागून फोम विक्रीचे दुकान असल्याने आगीची तीव्रता अधिक प्रकर्षाने समोर आली. महापालिकेच्या अग्निशमन पथकाने शटर तोडून क्लिनिकमधील ती आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.  

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बसस्टॅन्ड मार्गावरील तीन मजली शिवाजी कॉम्प्लेक्समधील एका बंद क्लिनिकला भीषण आग लागली. या आगीत क्लिनिकमधील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले. दुसऱ्या मजल्यावरील आगीच्या झळा तिसऱ्या मजल्यावरील कोचिंग क्लासपर्यंत पोहोचल्याने सुमारे ३५० ते ४०० विद्यार्थ्यांचे ‘रेस्क्यू’ करण्यात आले. त्या कॉम्प्लेक्समधील २५ ते ३० दुकानदार, तेथील कर्मचारी बाहेर पडल्याने मोठा हलकल्लोळ उडाला. शुक्रवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. महापालिकेच्या अग्निशमन यंत्रणेच्या पाच बंबांनी ती आग आटोक्यात आणली. तीन मजली शिवाजी कॉम्प्लेक्समध्ये फर्निचरसह वरच्या मजल्यावर काही कोचिंग क्लास आहेत. शुक्रवारी दुपारी दुसऱ्या मजल्यावरील डॉ. प्रकाश विश्वकर्मा यांच्या होमिओपॅथी क्लिनिकला अचानक आग लागली आणि एकच हाहाकार उडाला. क्लिनिकला लागून फोम विक्रीचे दुकान असल्याने आगीची तीव्रता अधिक प्रकर्षाने समोर आली. महापालिकेच्या अग्निशमन पथकाने शटर तोडून क्लिनिकमधील ती आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.  खिडक्यांनी झाकलेल्या तिसऱ्या मजल्यावरील बन्सल व अन्य क्लासपर्यंत देखील आगीचा ज्वाळा पोहोचल्या. त्यामुळे अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. त्यामुळे काही नागरिकांनी तिसऱ्या मजल्यावर धाव घेऊन आगीची माहिती दिली. तथा त्यांना सुखरुपपणे बाहेर काढले. बाहेर पडल्यानंतर शेकडो विद्यार्थ्यांनी सुटकेचा श्वास सोडला; मात्र बोटावर मोजण्याइतपतच विद्यार्थी होते, असा दावा करण्यात आला. 

फायर ऑडिट; पुन्हा नोटीसचा खेळशहराचा पारा ४३ अंशांवर पोहोचल्याने या आठवड्यात दररोज आगीच्या घटना घडत आहेत. महापालिकेच्या अग्निशमन विभागाला रोज १० ते १२ कॉल असून, गुरुवारी देखील सहा ठिकाणी आगी लागल्या होत्या. दरवर्षी उन्हाळ्यात आगीच्या घटना घडल्या की अग्निशमन संसाधनासह फायर ऑडिटचा मुद्दा ऐरणीवर येत असतो. नोटीसचा खेळ खेळला जातो; मात्र त्यापुढे काहीही होत नाही. गुजरातमधील घटनेच्या अनुषंगाने शहरात देखील कोचिंग क्लासला फायर ऑडिट बंधनकारक करण्यात आले.

ठाणेदार, उपायुक्तांची भेटशहर कोतवालीच्या ठाणेदार नीलिमा आरज व मनपा उपायुक्त सुरेश पाटील यांनी घटनास्थळ गाठून गांभीर्य जाणून घेतले.  हवालदिल विद्यार्थ्यांना धीर दिला. संकुलातील कोचिंग क्लाससह अन्य किती आस्थापनांमध्ये अग्निरोधक यंत्रणा आहे की कसे, याबाबत पाटील यांनी अग्निशमन अधीक्षकांना विचारणा केली.

 

टॅग्स :fireआग