नागरिक त्रस्त : पाणी नेमके मुरते कुठे?, अधिकाऱ्यांचे दुर्लक्षलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : येथील सामाजिक न्याय विभागाच्या विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयातून फाईली गहाळ होण्याचे प्रकरण वाढीस लागले आहे. याविभागाचा कारभार खासगीकडे वाटचाल करीत असल्याने जातप्रमाणपत्र पडताळणी देखील संशयाच्या भोवऱ्यात आली आहे. फाईली गहाळ का होतात, याचा शोध घेतला जात नाही, अशी माहिती आहे.शासनाने निवडणूक, नोकरी, शैक्षणिक आदींसाठी जातवैधता प्रमाणपत्र अनिवार्य केले आहे. त्याकरिता विशेष मागासप्रवर्ग, ईएसबी, एससी आदी प्रवर्गातील नागरिकांना प्रमाणपत्र मिळविण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या विभागीय जातप्रमाणपत्र पडताळणी समितीकडे कागदपत्रे सादर करावी लागतात. ही कागदपत्रे सादर करताना ‘जातपडताळणी’च्या सेतू केंद्रामार्फत प्रवास करावा लागतो. कागदपत्रांमध्ये काही त्रुटी असल्यास संबंधित उमेदवारांना त्यांची पूर्तता करण्याची संधी दिली जाते. मात्र, त्रुटी पूर्ण करण्यापूर्वीच याकार्यालयातून दाखल प्रकरणांच्या फाईली गहाळ होत असल्याचे गंभीर प्रकार वाढीस लागले आहेत. उमेदवार जातपडताळणी प्रमाणपत्राबाबत विचारणा करण्यास आले की, तुमचे प्रकरण आमच्याकडे नाही, असे ठरलेले उत्तर मिळते. हा विभाग नागरिकांसाठी की दलालांसाठी, हे समजायला मार्ग नाही. सामाजिक न्याय विभागाच्या विभागीय जातपडताळणी कार्यालयात ठराविक चेहऱ्यांनाच प्रवेश मिळत असल्याचे चित्र आहे. वर्षानुवर्षे ठराविक चेहऱ्यांचे ‘जातपडताळणी’त नेमके काय काम, सवाल उपस्थित होत आहे. या विभागात काही कामांची जबाबदारी खासगी तत्वावर सोपविल्याने गोपनियतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नोकरीसाठी २६ जुलै २०१६ रोजी जातपडताळणी प्रकरण सादर केले होते. त्याची पोचपावती आहे. मात्र, प्रकरणाची फाईल मिळत नसल्याने त्रस्त झालो आहे. किमान फाईल कुठे आहे, हे कळले पाहिजे. त्रुटींची पूर्तता केली आहे. - प्रवीण उके, अर्जदार, बडनेरा.जात प्रमाणपत्र पडताळणीचे फाईल गहाळ झाल्याप्रकरणी कुणी तक्रार नोंदविली नाही. माझ्याकडे संपर्क साधला असता तर त्याप्रकरणाचा निपटारा केला असता. प्रकरण दाखल झाल्यापासून त्याची टप्पाटप्याने नोंद घेतली जाते.- भीमराव खंडातेअध्यक्ष, विभागीय जात पडताळणी
‘जातपडताळणी’ला फाईल गहाळचा आजार
By admin | Published: June 02, 2017 12:08 AM