शहरं
Join us  
Trending Stories
1
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
2
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
3
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
4
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
6
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
7
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
8
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
9
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
10
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
11
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
12
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
13
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
14
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
15
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
16
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
17
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
18
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
19
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
20
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...

डम्मा देणाऱ्या आजीविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2021 4:09 AM

चिखलदरा (अमरावती) : आजारी नातवाला ताप आल्यामुळे गरम विड्याचे चटके (डम्मा) दिल्याप्रकरणी आजीविरुद्ध पोलिसांनी महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, ...

चिखलदरा (अमरावती) : आजारी नातवाला ताप आल्यामुळे गरम विड्याचे चटके (डम्मा) दिल्याप्रकरणी आजीविरुद्ध पोलिसांनी महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट अघोरी कृत्यांना प्रतिबंध निर्मूलन व काळी जादू नियम २०१३ चे कलम ३ व भादंविचे कलम ३२४ अंतर्गत शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल केला.

जासो गोडाम धांडेकर (६५, रा. खटकाली) असे आरोपी आजीचे नाव आहे. सलोना प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. केशव कंकाल (५२) यांनी याबाबत तक्रार नोंदविली. टेंब्रुसोंडा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत असलेल्या खटकाली गावात तीन वर्षीय राजरत्न जामूनकर या चिमुकल्याला ताप आल्याने धामणगाव गढी येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आले होते. ताप न उतरल्याने त्याच्या पोटावर गरम विड्याचे चटके दिले गेले. त्यामुळे त्याची प्रकृती खालावली. सदर माहिती आरोग्य कर्मचाऱ्यांना मिळताच त्यांनी चिखलदरा ग्रामीण रुग्णालयात त्याला उपचारार्थ दाखल केले. तेथून जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. या संपूर्ण प्रकरणात गरम विळ्याचे चटके देणाऱ्या आजीविरुद्ध चिखलदरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

बॉक्स

अघोरी डम्मा प्रथेचा केव्हा होणार नायनाट?

मेळघाटातील आदिवासींमध्ये अंधश्रद्धा आहे. कुठल्याही शुभ-अशुभ कार्यासाठी ते भूमकाकडे जातात. दुसरीकडे डोक्यापासून पायापर्यंत होणाऱ्या वेदनांवर डम्मा हाच उपचार असल्याची मान्यता आहे. चुलीतील विस्तवावर गरम विळा तापवून लहानांपासून तर मोठ्यापर्यंत दुखण्यावर चटके दिले जातात. अशा प्रकरणांंमध्ये संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येत आहे. प्रशासन व काही सामाजिक संघटना यांनी आदिवासींमध्ये जनजागृतीसाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले. मात्र, जिवावर बेतणारा अघोरी प्रकार सुरूच असल्याचे वास्तव आहे.

कोट

नातवाला गरम विळ्याचे चटके देणाऱ्या आजीविरुद्ध डॉक्टरच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- राहुल वाढिवे, ठाणेदार, चिखलदरा