अमरावती - महावितरणच्या अमरावती परिमंडळातील कृषिपंप ग्राहकांकडील वाढत्या थकबाकीला आळा घालण्यासाठी चालू देयक न भरणा-या शेतक-यांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सोमवारपासून हाती घेण्यात आली आहे. वसुली मोहिमेत परिमंडळाचे मुख्य अभियंता, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्याचे अधीक्षक अभियंते तसेच सर्व विभागीय कार्यकारी अभियंते सहभागी होणार आहेत.
अमरावती परिमंडळ अंतर्गत कृषिपंप वीजग्राहकांची थकबाकी वाढल्याने महावितरणसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. वीजक्षेत्रात उधारीचे दिवस संपुष्टात आले असल्याने वीज देयकांची वसुली होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीनेच आता कृषिपंप ग्राहकांच्या वीज बिल थकबाकी वसुलीकडे महावितरणने गांभीर्याने लक्ष पुरविले आहे. एप्रिल आणि जुलै २०१७ मध्ये आकारण्यात आलेले चालू देयके अर्थात दोन त्रैमासिक देयके कृषिपंपधारकांनी न भरल्यास त्यांचा वीजपुरवठा त्वरित खंडित करण्याचा निर्णय महावितरण प्रशासनाने घेतला आहे.अमरावती परिमंडळ अंतर्गत अमरावती आणि यवतमाळ या दोन्ही जिल्ह्यांमध्ये मोहीम राबवली जाणार आहे. परिमंडळात एकूण २ लाख ३७ हजार ५०० कृषिपंप वीज ग्राहकांकडे जून २०१७ अखेर १ हजार ४३२ कोटी ४२ लाखांची थकबाकी आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील १ लाख २५ हजार ५७० ग्राहकांकडे ६७४ कोटी ३४ लाख, तर यवतमाळ जिल्ह्यातील १ लाख ११ हजार ९७२ ग्राहकांकडे ७५८ कोटी ७ लाख रुपये थकबाकी आहे. थकबाकीदार कृषिपंपधारकांनी चालू वर्षातील दोन त्रैमासिक वीज देयके त्वरित भरून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन अमरावती परिमंडळाचे मुख्य अभियंता सुहास रंगारी यांनी केले.
अमरावती जिल्ह्यात चार विभागांतील थकबाकीदार अमरावती शहर विभाग ९४१ ५ कोटी ३४ लाखअमरावती ग्रामीण विभाग ४१,८१० १३९ कोटी ८३ लाखअचलपूर विभाग ४०,०४२ ३४८ कोटी ९२ लाख ९३ हजारमोर्शी विभाग ४२,७७७ १८० कोटी २४ लाख ८२ हजारयवतमाळ जिल्ह्यातील तीन विभागांतील थकबाकीदारयवतमाळ विभाग ३५,७७० २१२ कोटी ३८ लाख ३२ हजारपुसद विभाग ५२,७८० ४०० कोटी ४४ लाख ३७ हजारपांढरकवडा विभाग २३,४२२ १४५ कोटी २४ लाख ५८ हजार