शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसनं कोणत्या मार्गावर चालायला हवं? राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं, ओढली 'लक्ष्मणरेषा'!
2
"2012 पर्यंत हरी मंदिर होते...", संभलच्या शाही जामा मशिदीसंदर्भात भाजप आमदाराचा नवा दावा! शेअर केले PHOTO
3
"2019 मध्ये यांच्यासाठी जो 'चौकीदार' चोर होता, तो आता 'ईमानदार' झाला..."; असं का म्हणाले पीएम मोदी?
4
"प्रियांका गांधींच्या विजयानिमित्त वायनाडमध्ये निष्पाप गायीची हत्या"; धीरेंद्र शास्त्रींच्या पदयात्रेत रामभद्राचार्य यांचा आरोप!
5
EVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात, काँग्रेसच्या बैठकीत प्रियंका गांधींची मागणी
6
Mumbai Indians फिरवली पाठ, Ishan Kishan ने ठोकले ९ षटकार, अवघ्या २७ चेंडूत जिंकवली मॅच
7
बायडेन यांच्यासारखी मोदींची स्मरणशक्ती हरवत चालली हे राहुल गांधींचे वक्तव्य दुर्दैवी; परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
8
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
9
₹6 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, 600% नं वाढला भाव; या मोठ्या कंपनीनं 1600000 शेअरवर लावलाय 'डाव'!
10
IPL Auction 2025: Rishabh Pant वर लागली २७ कोटींची तगडी बोली, टॅक्स कापून हातात किती मिळणार?
11
चंपाई सोरेन यांची JMM मध्ये घरवापसी होणार? 'कोल्हन टायगर'ला हेमंत सोरेन यांची ऑफर..?
12
टीम इंडियाने लाँच केली नवी जर्सी, झाला महत्त्वाचा बदल; पहिल्यांदा कधी मैदानात कधी दिसणार?
13
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
14
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
15
मोठी बातमी! फोक्सवॅगनने १.४ अब्ज डॉलर कर चोरला; आधीच संकटात, त्यात भारताने पाठविली नोटीस : रिपोर्ट
16
शेअर असावा तर असा...! 4 वर्षांत दिला 10000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; ₹1000 वर पोहोचला भाव
17
Ayush Badoni ची कॅप्टन्सी! प्लेइंग इलेव्हनमधील सर्वांनी गोलंदाजी करत सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
19
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
20
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...

वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरा अन्यथा खुर्ची बाहेर काढू

By admin | Published: August 17, 2016 12:03 AM

जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या अख्यात्यारित येणाऱ्या चांदूरबाजार तालुक्यातील तीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात वैद्यकीय अधिकारीची पदे रिक्त आहेत.

इशारा : खासदार, जिल्हाधिकाऱ्यांना अल्टिमेटमअमरावती : जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या अख्यात्यारित येणाऱ्या चांदूरबाजार तालुक्यातील तीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात वैद्यकीय अधिकारीची पदे रिक्त आहेत. यामुळे गोरगरीब रूग्णांची गैरसोय होत आहे. ही जनहिताची मागणी लक्षात घेता तातडीने हा प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी सुरेखा ठाकरे यांच्या नेतृत्वात नागरिकांनी केली आहे. यावर दहा दिवसांत प्रशासनाने निर्णय न घेतल्यास अधिकाऱ्यांची खुर्ची बाहेर काढण्याचा इशारा खासदार व जिल्हाधिकारी यांना मंगळवारी दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे.चांदूरबाजार तालुक्यातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र हिरूळपूर्णा, राजना, आणि आसेगाव पूर्णा येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे मागील सहा महिन्यांपासून रिक्त आहेत. त्यामुळे रूग्णांची गैरसोय होत आहे. तसेच या ठिकाणी साठवून ठेवलेली औषधे कालबाह्य झाली आहेत. परिणामी हिरूळपूर्णा येथील एका हुशार मुलीचा वेळेवर उपचार न मिळाल्याने दुदैवी मृत्यू झाल्याचे या निवेदनात म्हटले आहे. अशा परिस्थितीत आरोग्य विभाग मात्र डोळेझाक करीत असल्याने ही बाब अतिशय खेदजनक असल्याचे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सुरेखा ठाकरे यांनी जिल्हाधिकारी व खासदार आनंदराव अडसूळ यांच्या निदर्शनास आणून दिलीे. त्यामुळे आरोग्य विभागाने तातडीने रिक्त असलेली आरोग्य अधिकाऱ्यांची पदे त्वरित भरावीत आणि औषध साठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली आहे. याबाबत येत्या दहा दिवसांत निर्णय घ्यावा, अन्यथा अधिकाऱ्यांची खुर्ची बाहेर काढण्याचा इशारा निवेदनाव्दारे प्रशासनाला दिला आहे. यावेळी झेडपीच्या माजी अध्यक्ष सुरेखा ठाकरे, सुभाष वैराळे, मोहन दवे, कदीर खॉ पठाण, चरण सदार, शिवपाल चपरिया, अरूण वाघमारे, गजानन कावरे, शामकुमार रंधे, उमेश काटोलकर, जावेद पठाण, विठ्ठल वैराडे, सुधाकर वैराडे, राजेश सदार आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)