कॉपी बहाद्दरांना चाप : कॉपीमुक्त अभियान राबविण्यासाठी उपाययोजनाअमरावती : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्ष २८ फेब्रुवारीपासून प्रारंभ होणार आहे. मात्र यात पारदर्शकता रहावी, यासाठी इंग्रजी, गणित विषयाच्या पेपरचे व्हिडीओ चित्रिकरण केले जाणार आहे. त्यामुळे कॉपीबहाद्दरांना चाप बसणार आहे. दरवर्षी इंग्रजी व गणित विषयाच्या पेपरच्यावेळी परीक्षा केंद्रांवर प्रचंड गर्दी राहते. परीक्षार्थ्यांना बाहेरुन कॉपी पुरविण्यासाठी नातेवाईक, पाल्यांची गर्दी ही बघावयास मिळते. परंतु यावेळी इंग्रजी व गणित पेपरच्या दिवशी हॉल तसेच परीक्षा केंद्रावर बाहेरील व्यक्तींचे व्हिडीओ चित्रिकरण केले जाणार आहे. त्यामुळे कॉपी पुरविताना चित्रीकरणात कैद झाल्यास अशाविरुद्ध पोलिसांकडून कारवाई करणे सोयीचे होणार आहे. जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान राबविण्यासाठी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी शिक्षण बोर्डाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. परीक्षा केंद्रांवर अनुसूचित प्रकार होऊ नये, यासाठी शिक्षण विभागाने आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. इयत्ता १० वी ची परीक्षा ७ मार्चपासून सुरु होत आहे. विभागातून १ लाख ५८ हजार ३४९ इतके विद्यार्थी परीक्षा देणार आहेत, तर जिल्ह्यातील १२६ परीक्षा केंद्रांवर २९ हजार २७३ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. १२ वीच्या परीक्षेसाठी विभागात ४५९ केंद्र राहणार आहेत.इयत्ता १० वीची परीक्षा ७ मार्चपासून सुरु होत आहे. या दोनही परीक्षेत इंग्रजी, गणित पेपरच्या दिवशी केंद्रावर कॉपी पुरविणाऱ्यांची गर्दी, ग्रामस्थांचा सुळसुळाट राहते. परीक्षा केंद्रांवर कॉपी पुरविणाऱ्यांची गर्दी पांगविण्यासाठी पोलीस, शिक्षण बोर्डाच्या अधिकाऱ्यांची दमछाक होते. त्यामुळे दक्षता समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार कॉपीमुक्त अभियानासाठी परीक्षा केंद्राचे व्हिडीओ चित्रीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यंदा कॉपी पुरविणाऱ्यांवर चाप बसणार आहे. गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. यात काही बैठे पथके देखील आहेत. इंग्रजी व गणित विषयाचे पेपरच्या दिवशी ही पथके परीक्षा केंद्रावर धाडसत्र राबविणार आहेत. इयत्ता १२ वी ची परीक्षा २८ फेब्रुवारी ते २५ मार्चपर्यत तर इयत्ता १० वी ची परीक्षा ७ मार्च ते १ एप्रिलपर्यत चालणार आहे. (प्रतिनिधी)संवेदनशील परीक्षा केंद्र लक्षइयत्ता १० व १२ वीच्या इंग्रजी, गणित विषय पेपरच्यावेळी यापूर्वीच्या नोंदीनुसार कॉपी चालणारे परीक्षा केंद्र बोर्डाने लक्ष केले आहे. या केंद्रावर व्हिडीओ चित्रीकरण अनिवार्य करण्यात आले आहे. त्यानुसार शिक्षण बोर्डाने तयारी चालविल्याची माहिती आहे. ग्रामीण भागातील बहुतांश केंद्रावर धाडी टाकण्याची व्यूहरचना असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.
इंग्रजी,गणिताच्या पेपरचे व्हिडीओ चित्रीकरण
By admin | Published: February 28, 2017 12:08 AM