शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
2
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
3
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
4
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
5
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
6
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
8
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
9
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
10
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
11
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
12
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
13
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
14
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
15
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
16
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात
18
ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?
19
कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी
20
David Warner चं कॅप्टन्सीचं ग्रहण सुटलं! RTM एन्ट्रीसह DC त्याला Rishabh Pant च्या जागी आजमावणार?

अखेर एमपीएससीच्या १४६ वनक्षेत्रपालांना परीविक्षाधीन बनविले, वनविभागाचे वरातीमागून घोडे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2018 7:29 PM

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निवडलेल्या १४६ वनक्षेत्रपालांना अखेर १८ महिन्यांचा परीविक्षाधीन कालावधी पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

- गणेश वासनिकअमरावती : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निवडलेल्या १४६ वनक्षेत्रपालांना अखेर १८ महिन्यांचा परीविक्षाधीन कालावधी पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहे. मात्र, असे असले तरी जबाबदारीच्या खुर्चीतून हे परीविक्षाधीन वनक्षेत्रपाल एकाच वेळी दोन्ही काम कसे सांभाळतील, हे मात्र कोडच आहे. ह्यलोकमतह्णच्या दणक्यामुळे वनविभागाने हा निर्णय घेतला आहे.वनविभागात आय.एफ.एस. ते वनक्षेत्रपाल या पदापर्यंत १८ महिन्यांचे पदस्थापनेपूर्वीच परीविक्षाधीन कालावधी पूर्ण करून प्रमाणपत्र मिळवून नंतर पोस्टिंग देण्यात यावे, असे शासन आदेश असतानासुद्धा अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (प्रशासन) नागपूर यांनी शासन निर्णयास केराची टोपली दाखवून एमपीएससीकडून आलेल्या १४६ वनक्षेत्रपालांना थेट पोस्टिंग दिल्याने वनविभागात वादंग उठले होते. यासंदर्भात लोकमतने २० जानेवारी एमपीएससीच्या १४६ वनक्षेत्रपालांना पदस्थापनेची खैरात या आशयाचे वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (प्रशासन) ए. आर. मंडे यांनी २० जानेवारी रोजी पत्र जारी करून पदस्थापना केलेल्या १४६ वनक्षेत्रपालांना जबाबदारीच्या पदावरून कार्यमुक्त न करता त्या विभागात परीविक्षाधीन कालावधी पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. यामुळे वनविभागाची गोची झाली. कारण १४६ वनक्षेत्रपालांमध्ये ९० च्या आसपास वनक्षेत्रपालांना प्रादेशिक व वन्यजीव विभागात पोस्टिंग देण्यात आली. त्यांना पोस्टिंग आणि प्रोबेशन एकाच वेळी कसे करता येईल, हा मुद्दा उपस्थित झाला आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर शासन निर्णय २९ फेब्रुवारी २०१६ व वनक्षेत्रपाल सेवा प्रवेश नियम ६ एप्रिल १९९८ प्रमाणे १८ महिन्यांचे स्वतंत्र परीविक्षाधीन कालावधी पूर्ण करून त्यानंतरच त्यांची पोस्टिंग करणे गरजेचे आहे. नियमास बगल देऊन अगोदर पोस्टिंग आणि नंतर परीविक्षाधीन कालावधी असा प्रकार अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (प्रशासन) यांनी केलेला आहे. सदर पद्धत चुकीची ठरली आहे. हा प्रकार वरातीमागून घोडे दामटण्याचा असल्याचे बोलले जात आहे.अधिसंख्य पदे निर्माण केलेच नाहीलोकसेवा आयोगामार्फत १४६ वनक्षेत्रपाल येणार असल्याची माहिती वनविभागाला नव्हती. १८ महिन्यांचे परिविक्षाधीन कालावधी त्यांना पूर्ण करणे अनिवार्य आहे. मात्र, त्यासाठी तात्पुरती अधिसंख्य पदे निर्माण करून रिक्त पदांवर वनपालांना पदोन्नती देणे गरजेचे होते. तथापि, वन प्रशासनाने सरळ सेवा वनक्षेत्रपालांना थेट पोस्टिंग दिल्याने वनरक्षक-वनपाल संघटनेने याप्रकरणी वनविभागाचे प्रधान सचिवांकडे १९ जानेवारी रोजी तक्रार दाखल केली. या प्रकाराविरूद्ध न्यायालयात जाण्याचाही इशारा देण्यात आला आहे.प्रोबेशनचा वनविभागात धुव्वावनविभागात येणारे आयएफएस किंवा इतर कनिष्ठ वनाधिका-यांना प्रशिक्षण देण्यात येते. त्यानंतर त्यांना वर्षभर किंवा दीड वर्षे प्रशिक्षण संपल्यावर प्रोबेशन केल्यावर आणि त्यात उत्तीर्ण झाल्यावर मोक्याच्या जागेवर पोस्टिंग देण्याचे नियम आहे. मात्र, गत पाच वर्षांपासून थेट पोस्टिंग देण्याचा प्रघात पाडला आहे. हा प्रकार शासनाला आव्हान ठरणारा आहे. वनपालांना पदोन्नती देण्यासाठी सहा महिन्यांत पदोन्नती समितीची बैठक बोलावण्यात आलेली नाही. पदोन्नतीच्या कोट्यावर सरळसेवा वनक्षेत्रपालांना पोस्टिंग देण्यात आली, हे विशेष.