गणेश वासनिक, अमरावती : राज्याच्या वनविभागाने गत वर्षभरापासून रिक्त असलेल्या ७७ विभागीय वनअधिकारीपदी सहायक वनसंरक्षकांना पदोन्नती बहाल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महसूल विभागात रिक्त असलेल्या विभागीय वनअधिकारी पदांचा बॅकलॉग भरून निघणार आहे. विशेषत: गडचिरोली नक्षलग्रस्त भागात नव्याने डीसीएफ मिळणार आहे.
‘लोकमत’ने ७ जुलै २०२३ रोजी ‘वनाधिकाऱ्यांची ७७ पदे रिक्त’ या आशयाखाली वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत राज्याच्या महसूल व वनविभागाचे अवर सचिव आनंदा शेडगे यांच्या स्वाक्षरी १२ जुलै २०२३ रोजी सहायक वनसंरक्षक गड- अ (कनिष्ठ श्रेणी) संवर्गातून विभागीय वन अधिकारी गट- अ (वरिष्ठ श्रेणी) संवर्गात पदोन्नती देण्याबाबत आदेश जारी केला आहे.असे झालेत वन अधिकाऱ्यांना महसूल विभाग वाटप
नागपूर : ३१औरंगाबाद : १०पुणे : ११अमरावती : १०नाशिक : ०९कोकण : ०६