शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेंडालमधून गुरुजींची कार निघाली, लोक दर्शनासाठी धावले अन्..."; नेमकं काय घडलं? पीडित प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
2
हाथरस दुर्घटना : मृतदेह बघून हृदयविकाराचा झटका, कर्तव्यावर असलेल्या पोलीस शिपायाचा मृत्यू
3
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे नियम बदलले; CM शिंदेंनी बैठकीत घेतले महत्त्वाचे निर्णय
4
"देशाने 1 जुलैला 'खटाखट दिवस' साजरा केला, लोक बँक खाते चेक करत होते...", PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार निशाणा
5
IB मध्ये नोकरी, आता धार्मिक सत्संग; कोण आहेत भोले बाबा? ज्यांच्या कार्यक्रमात झाली चेंगराचेंगरी
6
पिंपरी जलसेनची जिल्हा परिषद शाळा खासगी शाळेवर भारी, २२ गावांतून येतात विद्यार्थी
7
चक्रीवादळात अडकलेल्या टीम इंडियाचा मार्ग मोकळा; या तारखेला मायदेशी परतणार सर्व खेळाडू
8
"ही आता परजीवी काँग्रेस; ज्याच्यासोबत असते त्यालाच...", पंतप्रधान मोदींची लोकसभेत तुफान फटकेबाजी
9
“ऋण काढून सण करायला लावणारा अतिरिक्त अर्थसंकल्प”; विजय वडेट्टीवार यांची घणाघाती टीका
10
Pune :पुणे सोलापूर हायवेवर कारचा भीषण अपघात; ५ जणांचा जागीच मृत्यू
11
भावना गवळी, कृपाल तुमानेंना विधानपरिषदेची उमेदवारी; शिंदे गटात नाराजी
12
हाथरस येथील चेंगराचेंगरीतील मृतांचा आकडा वाढला, रुग्णालयात मृतदेह ठेवण्यासाठीही उरली नाही जागा   
13
"हिंदूंना विचार करावा लागेल, हा अपमान योगायोग की प्रयोग'; लोकसभेत काय म्हणाले PM मोदी?
14
"आजकल बच्चे का मन बहलाने का काम चल रहा है...", निवडणूक निकालावरून पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
15
"सलग तिसऱ्यांदा १०० च्या आत, तिसरा पराभव, तरीही काँग्रेस आणि त्यांची इकोसिस्टिम...", मोदींचा खोचक टोला
16
"बाबूजी म्हणजे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील खणखणीत नाणे", देवेंद्र फडणवीसांकडून स्व. जवाहरलाल दर्डांना अभिवादन
17
“जयंत पाटील तुम्ही नकली वाघांसोबत आहात, जरा असली वाघांसोबत या”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
18
"मतदारांनी काँग्रेसलाही जनादेश दिला, तो विरोधी बाकावर बसण्याचा", PM मोदींची बोचरी टीका...
19
“तिसऱ्या टर्ममध्ये तिप्पट वेगाने काम, विकसित भारताचा संकल्प पूर्ण होणार”; PM मोदींची लोकसभेत गॅरंटी
20
"2014 पूर्वी देशात घोटाळ्याचा काळ होता...", लोकसभेतून PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

अखेर प्रभारी वैद्यकीय अधीक्षिका लीना भुतडा पायउतार

By admin | Published: November 07, 2015 12:15 AM

स्थानिक ग्रामीण रूग्णालयात रूग्णांची होत असलेली गैरसोय व कर्मचाऱ्यांचा बेजबाबदारपणा व रुग्णालयातील गंभीर प्रकारच्या घटना घडत असताना ...

कारवाई : अधीक्षकांचा पद्भार मरसकोल्हे यांच्याकडेचांदूररेल्वे : स्थानिक ग्रामीण रूग्णालयात रूग्णांची होत असलेली गैरसोय व कर्मचाऱ्यांचा बेजबाबदारपणा व रुग्णालयातील गंभीर प्रकारच्या घटना घडत असताना जिल्हा आरोग्य यंत्रणेचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. अशातच १६ आॅक्टोबरला जिल्हा शल्यचिकित्सक अरूण राऊत यांनी स्थानिक ग्रामीण रूग्णालयाला सकाळी भेट दिली. यावेळी चांदूररेल्वे येथील पत्रकारांनीच त्यांना घेराव घालून निवेदन दिले व रूग्णांची होणारी गैरसोय थांबवा तसेच बेजबाबदार अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करा अन्यथा जनआंदोलनाचा इशारादेखील दिला होता. याचाच धसका घेऊन जिल्हा शल्यचिकित्सक यांनी प्रभारी वैद्यकीय अधीक्षिकेचा पद्भार डॉ. लीना भुतडा यांच्याकडून काढून डॉ. मरसकोल्हे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. चांदूररेल्वे ग्रामीण रूग्णालयाचा भोंगळ कारभार जिल्हाभर चर्चेचा विषय बनला होता. या रूग्णालयात रूग्णांची अतिशय गैरसोय होत होती. कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे रूग्णालयात गंभीर प्रकारच्या घटना घडत होत्या. प्रभारी वैद्यकीय अधीक्षिका लीना भुतडा यांचे रूग्णालयावर कुठल्याही प्रकारचे लक्ष नसल्याचे निदर्शनास येत होते. अशातच चांदूररेल्वे रुग्णालयात १६ आॅक्टोबरला सकाळीच जिल्हा शल्यचिकित्सक अरुण राऊत यांनी भेट दिली. यावेळी शहरातील पत्रकार रवींद्र मेंढे, प्रशांत कांबळे, विवेक राऊत, सीसीएनचे संचालक अमोल गवळी, मनीष खुणे आदींसह शरवासीयांनी ग्रामीण रुग्णालयात पोहचून शल्यचिकित्सक यांनी घेराव घातला आणि पत्रकार संघटनेकडून निवेदन देण्यात आले होते. यावेळी लवकरात लवकर बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई व रुग्णालयाची दुरवस्था सुधारल्या गेली नसल्यास पत्रकार संघटनेच्या माध्यमातून जनआंदोलन उभारण्यात येईल आणि मागण्या पूर्ण होइपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला होता. याचाच धसका जिल्हा शल्यचिकित्सक राऊत यांनी घेत बेजबाबदार प्रभारी वैद्यकीय अधीक्षिका डॉ. लीना भुतडा यांना चांगलेच धारेवर धरले. (तालुका प्रतिनिधी)