भातकुली : तालुक्यातील खारतळेगाव येथील रहिवासी चुन्नीलाल सोमवंशी यांच्या घराला अचानक रात्री १५ दिवसांपूर्वी आग लागली होती. या आगीत त्यांच्या घराचे नुकसान झाले होते. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांना काही दिवस मंदिरात राहावे लागले होते. या घटनेची माहिती मिळताच आ. यशोमती ठाकूर यांनी खारतळेगाव येथे सोमवंशी दाम्पत्याची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा करून भातकुली तहसीलदार येडे यांच्याशी संपर्क साधून व पत्रव्यवहार करून नुकसानग्रस्त कुटुंबास सानुग्रह आर्थिक मदत करण्याच्या सूचना आ. ठाकूर यांनी केल्या. यावर लगेच पंचनामा करून या कुटुंबास महसूल खात्यामार्फत आर्थिक मदत नुकतीच देण्यात आली. यावेळी यशोमती ठाकूर, जि.प. सभापती जयंत देशमुख, हरिभाऊ मोहोड, जि. प. सदस्य गजानन राठोड, तालुकाध्यक्ष मुकदर पठाण, तालुकाध्यक्ष वीरेंद्र जाधव, हरीश मोरे, वैभव वानखडे, गिरीश देशमुख, रूपेश कळसकर, राजू कुºहेकर, सुनील जुनघरे, जितेंद्र ठाकूर, भास्कर गुडघे, वहिद भाई आदी गावकरी पदाधिकारी उपस्थित होते.
खारतळेगाव येथील सोमवंशी कुटुंबास आर्थिक मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 1:34 AM
तालुक्यातील खारतळेगाव येथील रहिवासी चुन्नीलाल सोमवंशी यांच्या घराला अचानक रात्री १५ दिवसांपूर्वी आग लागली होती. या आगीत त्यांच्या घराचे नुकसान झाले होते. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांना काही दिवस मंदिरात राहावे लागले होते.
ठळक मुद्देयशोमती ठाकूर यांचा पुढाकार : महसूल विभागाची सकारात्मक भूमिका