लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : भारतीय शिक्षण पध्दतीत मध्यंतरीच्या काळात अनेक आमुलाग्र बदल झालेत. जागतिकीकरणाच्या आजच्या काळात नवनवीन बाबींचा समावेश शिक्षण पध्दतीत होण्याची गरज आहे. तंत्रज्ञानात सातत्याने बदल होत आहेत. शिक्षण क्षेत्राकडूनही समाजाच्या अपेक्षा पूर्वी पेक्षा वाढल्या आहे. विद्यार्थ्यांना हवे असलेले शिक्षण मिळावे, यासाठी पंचवार्षिक बृहत आराखडा तयार करावयाचा असून आयोजित कार्यशाळा त्यादृष्टिने मैलाचा दगड ठरेल, असे प्रतिपादन कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी केले.सन २०१९-२० ते २०२३-२४ असा पाच वर्षीय शैक्षणिक बृहत आराखडा तयार करण्यासाठी विद्यापीठ दृकश्राव्य सभागृहात कार्यशाळा संपन्न झाली, त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. व्यासपीठावर प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर, आनंद मापूसकर, मिलिंद सोहनी, बी.एन. जगताप, कुलसचिव अजय देशमुख, उपकुलसचिव सुलभा पाटील उपस्थित होते.कुलगुरु म्हणाले, विद्यापीठाचे पुढील पाच वर्षांचे शिक्षण कसे राहील, यासाठी बृहत आराखडा कार्यशाळांचे आयोजन होत असून त्यावरुन राज्याचा शैक्षणिक बृहत आराखडा तयार होणार आहे. पूर्वी व्यक्तीकेंद्रीत शैक्षणिक प्रवास होता; पण आता समाजामध्ये शैक्षणिक जागृती झाली आहे. समाजाच्या शैक्षणिक अपेक्षा वाढल्या आहेत. पारंपारिक शिक्षण, पदवी नोकरीसाठी पुरेशी नाही, असे ते महणाले.
बदलत्या काळानुरुप समाजोपयोगी शिक्षण मिळावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 10:56 PM
भारतीय शिक्षण पध्दतीत मध्यंतरीच्या काळात अनेक आमुलाग्र बदल झालेत. जागतिकीकरणाच्या आजच्या काळात नवनवीन बाबींचा समावेश शिक्षण पध्दतीत होण्याची गरज आहे. तंत्रज्ञानात सातत्याने बदल होत आहेत.
ठळक मुद्देकुलगुरू : विद्यापीठात पंचवार्षिक बृहत् आराखडा कार्यशाळा