आॅनलाईन लोकमतअमरावती : शैलजा निलंगे हत्या प्रकरणातील तपासकार्यात फे्रजरपुरा पोलीस शनिवारी परतवाडा तालुक्यातील एकलासपूर गावात गेले. आरोपी धीरज शिंदे याच्या प्रेयसीचे एकलापूर येथे घर आहे. या घराची पोलिसांनी झडती घेतली. धीरजला ५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, त्याच्याकडून पोलिसांनी शैलजा निलंगे यांचे दागिने व मोबाइल जप्त केला आहे.जलारामनगरातील रहिवासी सेवानिवृत्त शिक्षिका शैलजा निलंगे यांची भाडेकरू धीरजने गळा आवळून हत्या केली. हत्याकांडाचा गुंता उघड करण्यासाठी पोलिसांनी बरेच प्रयत्न केले. अखेर एटीएममधील सीसीटीव्हीने धीरजचे बिंग फुटले. पैशांच्या हव्यासापोटी धीरजने शैलजा निलंगेची हत्या केल्याचे निष्पन्न झाले. शैलजा यांच्या हत्येनंतर धीरज त्याच्या प्रेयसीकडे गेला होता. त्याने शैलजा यांच्या घरातून चोरलेले पैसे व दागिने प्रेयसीच्या स्वाधीन केले. त्यानंतर धीरजची प्रेयसी एकलासपूर येथील तिच्या आईच्या घरी गेली होती. ही बाब फे्रजरपुरा पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर शनिवारी तिला घेऊन फे्रजरपुरा पोलीस एकलासपूर येथे गेले. रात्री उशिरापर्यंत पोलिसांची चौकशी सुरू होती. धीरजच्या प्रेयसीच्या घरातून पोलिसांनी किती मुद्देमाल जप्त केला, ही बाब कळू शकली नाही.
प्रेयसीच्या एकलासपूर येथील घराची झडती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2018 10:02 PM
शैलजा निलंगे हत्या प्रकरणातील तपासकार्यात फे्रजरपुरा पोलीस शनिवारी परतवाडा तालुक्यातील एकलासपूर गावात गेले.
ठळक मुद्देआरोपीला ५ पर्यंत पोलीस कोठडी : धीरज शिंदेकडून दागिने, मोबाईल जप्त