अमरावती : विदर्भ पटवारी संघटनेचे अध्यक्ष महादेवराव राजूरकर व माजी अध्यक्ष संजय ढोक यांच्याविरुद्ध राजापेठ पोलीस ठाण्यात भादंविचे कलम ४२० अन्वये एफआयआर व दोषारोपपत्र व न्यायालयात प्रलंबित प्रकरण खारीज करून दोषमुक्त करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपीठाने ३ डिसेंबर रोजी दिले आहे. न्यायमूर्ती व्ही.एम. देशपांडे व न्यायमूर्ती अनिल किलोर यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला.
पटवारी पतसंस्थेचे संचालक फिर्यादी किशोर वानखडे यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात पटवारी पतसंस्थांमध्ये कोट्यवधी रुपयांचा अपहार झाल्याप्रकरणी तक्रार नोंदविली होती. त्या आधारे, राजापेठ पोलिसांनी एफआयआर दाखल केला होता. मात्र, पटवारी संघटनेने ऑडिट रिपोर्ट, असेसमेंट रिपोर्टदेखील सादर केला. मात्र, पोलिसांनी एफआरआर दाखल केला. याबाबत विदर्भ पटवारी संघटनेचे उच्च न्यायालायत धाव घेतले. वकील परवेज मिर्झा यांनी एफआयआर व दोषारोपपत्र खारीज करण्याकरिता जोरदार युक्तिवाद केला. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर एफआयआर खारीज करण्याचे आदेश दिले.