शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची कॅनडाविरोधात मोठी कारवाई! 6 उच्चायुक्तांची हकालपट्टी, 5 दिवसांत सोडावा लागणार देश
2
"...ज्यावरून मी त्याला कायम चिडवायचो"; अतुल परचुरेंच्या निधनाने राज ठाकरे झाले भावूक
3
Mumbai Video: बापाने हात जोडले, मुलाला वाचण्यासाठी आई अंगावर पडली; पण ते मरेपर्यंत मारत राहिले
4
Atul Parchure Passed Away: 'वल्ली' अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरे यांचं निधन, काही वर्षांपूर्वीच कर्करोगावर केलेली मात
5
मोठी बातमी: राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी सरकारकडून ७ नावांवर शिक्कामोर्तब; कोणाकोणाला मिळाली संधी?
6
नववीपासूनची मैत्री...अतुल परचुरेंच्या निधनानंतर जयवंत वाडकर भावूक; शेअर केला शेवटचा फोटो
7
चतुरस्त्र अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरेंच्या निधनानंतर CM एकनाथ शिंदेंसह राजकीय विश्वातून आदरांजली
8
"....तोपर्यंत हे म्हातारं काही थांबत नाही"; शरद पवारांचा निर्धार काय?
9
Pune Crime: पुण्यात तरुणीवर अत्याचार करणाऱ्या दुसऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; यूपीतून अटक!
10
कृष्णा महाराज शास्त्री भगवानगडाचे उत्तराधिकारी होणार; कधी बसणार गादीवर? जाणून घ्या...
11
उद्धव ठाकरेंवर अँजिऑप्लास्टी नाही, केवळ नियमित तपासणी; आदित्य ठाकरेंची माहिती
12
हरयाणा निकालातून घेतला धडा; महाराष्ट्रातील नेत्यांना काँग्रेस हायकमांडचे ३ आदेश
13
'४८ पैकी ३१ जागा जिंकल्यावर यांना लाडकी बहीण आठवली'; शरद पवारांचा महायुती सरकारला खोचक टोला
14
ठाकरेंना धक्का, टोपेंचं वाढलं टेन्शनl; 'शिवबंधन' तोंडत हिकमत उढाण शिंदेंच्या शिवसेनेत!
15
Acidity ने हैराण झालायत? वारंवार पोटात जळजळतं? 'हे' ५ उपाय करा, नक्की वाटेल 'रिलॅक्स'!
16
वक्फ विधेयकावरुन पुन्हा गोंधळ; विरोधी खासदारांनी जेपीसीच्या बैठकीवर बहिष्कार टाकला
17
शिंदे-फडणवीस-अजित पवारांची उद्या महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद; जागावाटपाच्या फॉर्म्युल्याची घोषणा होणार? 
18
अजित पवारांना धक्का! रामराजेंचे विश्वासू आमदार दीपक चव्हाणांच्या हाती 'तुतारी'
19
आम्ही झेल सोडून चेंडूला विश्रांती देतो; माजी भारतीय खेळाडूचे पाकिस्तानवर शाब्दिक हल्ले, कारण...
20
Bigg Boss 18: गुणरत्न सदावर्ते बिग बॉसच्या घरातून बाहेर, नक्की कारण काय? जाणून घ्या...

आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या संजय कदमविरुध्द गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2018 10:31 PM

मराठा आरक्षणाची मागणी घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्न करणाºया संजय महादेव कदम (रा. वडाळी, देवीनगर) याच्याविरुद्ध गुरुवारी सायंकाळी गुन्हा नोंदविण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मराठा आरक्षणाची मागणी घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्न करणाºया संजय महादेव कदम (रा. वडाळी, देवीनगर) याच्याविरुद्ध गुरुवारी सायंकाळी गुन्हा नोंदविण्यात आला.राज्यभरात मराठा आरक्षणाच्या मागणीची धग कायम असताना, त्याचे पडसाद विविध ठिकाणी उमटत आहेत. गुरुवारी दुपारी २.१५ वाजताच्या सुमारास संजय महादेव कदम नामक व्यक्ती अचानक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पोहोचली. त्याने मराठा आरक्षणावर तारीख पे तारीख मिळत असल्याची ओरड केली. काकासाहेब शिंदे या मराठ्याने आरक्षणासाठी आत्महत्या केली. मीदेखील आत्महत्या करणार आहे, असे म्हणून संजय कदमने बिसलरी बॉटलमध्ये आणलेले रॉकेल अंगावर ओतले. हा प्रकार तेथे उपस्थित असणाºया पोलिसांना दिसताच त्यांनी तात्काळ संजय कदमला ताब्यात घेतले. याप्रकरणात गाडगेनगर पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी हेमंत वाकोडे यांनी तक्रार नोंदविली असून, संजय कदमविरुद्ध भादंविच्या कलम ३०९ अन्वये गुन्हा नोंदविला आहे.डीसीआरमध्ये घटनास्थळ बदलविलेसंजय कदम यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात अंगावर रॉकेल घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही बाब अनेकांनी बघितली. मात्र, गाडगेनगर पोलिसांनी पोलीस नियंत्रण कक्षाला दिलेल्या माहितीत घटनास्थळ बियाणी चौक दाखविण्यात आले. ही चूक आहे की मुद्दाम करण्यात आले, ही बाब संभ्रम निर्माण करणारी ठरते. माध्यमांना दररोज प्राप्त होणाºया डेली क्राइम रिपोर्टमध्ये ही बाब निदर्शनास आली असून, या घटनेविषयी तपास अधिकारी संतोष तोकलवाड दाखविण्यात आले आहे. मात्र, त्यांना याविषयी काही माहिती नसल्याचे आढळून आले.