शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
6
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
7
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
8
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
9
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
10
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
11
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
13
व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'
14
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
15
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
16
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
17
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
18
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
19
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
20
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात

बडनेराजवळ धावत्या मालगाडीच्या पेट्रोल टँकरला आग, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2019 7:13 PM

बावन्न टँकर पेट्रोलने भरून नेत असताना मालगाडीच्या एका टँकरला आग लागल्याची बाब बडनेरापासून जवळच असणाऱ्या  टीमटाला रेल्वेस्थानकावर लक्षात आली.

अमरावती- बावन्न टँकर पेट्रोलने भरून नेत असताना मालगाडीच्या एका टँकरला आग लागल्याची बाब बडनेरापासून जवळच असणाऱ्या  टीमटाला रेल्वेस्थानकावर लक्षात आली. आगीच्या भक्ष्यस्थानी सापडलेल्या पेट्रोल टँकरला वेळीच विझविण्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली. ही घटना सोमवारी दुपारी १२ वाजता घडली.पानेवाडी येथून पेट्रोल भरून ५२ टँकरची मालगाडी लाखोडी येथे जात  होती. या गाडीच्या इंजिनपासून २३ क्रमांकाच्या टँकरला आग लागल्याचे मालगाडीचे गार्ड एस.एम. मगर यांच्या लक्षात आली. त्यांनी वाकीटाकीद्वारे पायलट पी.व्ही. नगनारे, स्टेशन मास्तर सुनीता बोडखे यांना दिली. सदर माहिती टिमटाला स्टेशन मास्तर सतीश अढावू यांना दिल्यावर ही मालगाडी टीमटाळा रेल्वे स्थानकावर उभी करण्यात आली. दरम्यान अग्निशमन दलाचे बंब, बडनेरा रेल्वे पोलीस, गावकरी घटनास्थळी पोहोचले. तत्काळ रेल्वे प्रशासनाने ओव्हरहेड विद्युत पुरवठा खंडित केला व ज्या डब्याला आग लागली त्याच्यासमोरील व मागील टँकर मोकळे करण्यात आले. अग्निशमन दलाच्या कर्मचा-यांनी टँकरची आग शमविली.बडनेरा रेल्वे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक एस.डी. वानखडे, कर्मचारी राहुल हिरोडे, राजू व-हाडे, अग्निशमन दलाचे अमरावती येथील हर्षद दहातोंडे, सतीश घाटे, आकाश राऊत, धनराज कांदे, वैभव गजभारे, श्रेयस मेटे, अजय ढोके, नझीर अहमद, चांदूर रेल्वेचे अमोल कडू, मयूर घोडेस्वार, अविनाश यादव यासह रेल्वे प्रशासनाचे इतर अधिकारी, कर्मचारी, परिसरातील गावक-यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. अन्यथा मोठी घटना घडली असती. टँकरला लागलेली आग नियंत्रणात आणण्यासाठी अमरावती महापालिका व चांदूर रेल्वे नगर परिषदेच्या अग्निशमन कर्मचाºयांनी शर्थीचे प्रयत्न केले.

रेल्वे गाड्या दोन तास खोळंबल्याधावत्या मालगाडीच्या पेट्रोल टँकरला आग लागल्यामुळे नागपूर व अकोल्याहून येणाºया प्रवासी व मालगाड्या अडवून ठेवण्यात आल्या. तब्बल दोन तासांनंतर वाहतूक सुरळीत झाली. या घटनेमुळे गोंडवाना एक्सप्रेस, पुरी-अहमदाबाद, दोन्ही बाजूने येणाºया महाराष्टÑ एक्सप्रेस उशिराने धावल्यात. याचा काहीसा फटका प्रवाशांना बसला.

उष्णतेमुळे टँकरला आग लागल्याचा प्राथमिक अंदाजसध्या उन्हाचा पारा प्रचंड आहे. तीव्र उष्णतेमुळे पेट्रोल टँकरला आग लागली असावी, असा अंदाज रेल्वेचे अधिकारी लावत आहेत. प्रत्यक्षात मात्र त्याचे नेमके कारण शोधले जाईल, असेही सांगण्यात येत आहे.

टॅग्स :Amravatiअमरावतीfireआगrailwayरेल्वे