तिवसा येथील घटना : अग्निशमन बंब पोहोचले उशिरा तिवसा : तिवसा शहरातील पेठपुरा नेर पांदण परिसरात कडबा कुटाराच्या गंजीला भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. सुमारे ३ तास नागरिकांनी प्रयत्न केल्यानंतर आग आटोक्यात आली. गावालगतच आगीची घटना घडल्याने ती वस्तीत पसरू शकते, अशी भीती निर्माण झाली होती. दरम्यान आगीचे रौद्ररुप पाहून स्थानिकांनी अग्निशमन दलास पचारण केले. मात्र, महानगरपालिका अग्निशमन दलाच े वाहन आल्याने तिन तासानंतर आग नियंत्रणात आल्याने पुढील अनर्थ टळला.कडबा कुटाराच्या गंजीला आग लावल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. आगीची माहिती गावात पसरताच नागरिकांची धावपळ सुरू झाली. अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. तीन तासांच्या आटोकाट प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आली. आ. यशोमती ठाकूर यांनी तत्काळ प्रशासनाला सूचना दिल्या. अग्निशमन दलाच्या चमुने आग नियंत्रणात आणल्याने नगरपंचायत उपाध्यक्ष वैभव वानखडे, नगरसेवक नरेंद्र विघ्ने, सचिन गोरे, योगेश वानखडे, वैभव काकडेसह आदींनी अग्निशमन दलाचे फायरमन नरेंद्र मिठे, नशीब खान, राजेश गजबे, अमित ददगाळ, शहबाज खान, नवेद इकबाल यांचा सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)क्षणार्धात स्वयंपाकघर खाकनांदगावातील घटना : तीन दिवसांत तीन ठिकाणी आगनांदगाव खंडेश्वर : स्थानिक वॉर्ड क्रमांक ९ मधील टेकडीपुऱ्यातील मुस्लिमबहुल भागात लागलेल्या आगीने अब्दुल सलाम यांच्या घरातील स्वयंपाकघर जळून खाक झाले. ही घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. अब्दुल सलाम यांचे स्वयंपाकघर आगीच्या भक्षस्थानी सापडल्याने कुटुंबीयांच्या उपजिविकेसाठी जमा केलेली साधन सामग्री क्षणात नष्ट झाल्याने हे गरीब कुटुंब हवालदिल झाले आहे. यात टिनपत्रे, लाकूड फाटा व अन्नधान्याची हानी झाली. आगीत हजारो रुपयांचे नुकसान झाले. दोन दिवसांपूर्वी तहसील परिसरातसुद्धा आग लागली. तालुक्यातील पापळ येथेही आग लागून वित्तहानी झाली. परंतु, सततच्या घटना घडूनही शासन अग्निशमन वाहन देण्यास असमर्थ ठरत असल्याने नागरिकांमध्ये शासनाप्रती प्रचंड रोष व्यक्त होत आहे. आग विझविण्यासाठी श्रीशान बॉम्बे, मो. बत्सी, इद्रीस, सलाम जिबीक, मो.सुफीयान, तौफिकसेठ यांनी प्रयत्न केले. घटनास्थळी एपीआय रीता उईके, तहसीलदार बी.व्ही. वाहुरवाघ, नगराध्यक्ष अक्षय पारस्कर, फिरोज खान, सतीश पटेल यांनी भेट दिली. (शहर प्रतिनिधी)आर्थिक मदतीची मागणीहलाखीचे जीवन जगत असलेल्या आगग्रस्त कुटुंबाला शासनाने त्वरित आर्थिक मदत द्यावी, जेणेकरून या गरीब कुटुंबाला आधार होईल, अशी मागणी पाणीपुरवठा सभापती फिरोज खान यांनी तहसीलदारांकडे केली आहे. न.पं.साठी अग्निशमन वाहन देण्यासंदर्भात शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. परंतु, अद्यापपर्यंत शासनाने याबाबत कुठलीच दखल घेतली नाही. - अक्षय पारस्कर, नगराध्यक्ष
गावालगतच्या खळ्यांना आग
By admin | Published: April 19, 2017 12:17 AM