शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मोठी घडामोड! प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजित पवारांनी निर्णय बदलला, सिंदखेड राजामध्ये शिंदेंच्या उमेदवाराला पाठिंबा दिला
2
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
3
राहुल गांधींनी भर पत्रकार परिषदेत आणली तिजोरी, आतून काढली दोन पोस्टर्स अन् म्हणाले...
4
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
5
Maharashtra Election 2024 Live Updates: मतदानाच्या अवघ्या दोन दिवस आधी अजित पवार गटाचा मोठा निर्णय, खेळी फिरणार?
6
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
7
"मुख्यमंत्री नाही, पण ५ मिनिटांसाठी तरी पंतप्रधान होणार", महादेव जानकरांनी व्यक्त केला विश्वास 
8
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
9
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा
10
Mamaearth Shares: कंपनीचा शेअर आपटला; २० टक्क्यांची घसरण, IPO प्राईजच्याही खाली आला भाव
11
Basmath Vidhan Sabha 2024: दोन राष्ट्रवादीत लढत! जयप्रकाश दांडेगावकर vs राजू नवघरे रिंगणात... गुरूच्या विरोधात शिष्य!
12
IND vs AUS टेस्टआधी आणखी एक ट्विस्ट; स्पेशल कॉलनंतर पुजारा 'फ्लाइट मोड'वर
13
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
14
शाळांच्या सुट्टीबद्दल शिक्षण आयुक्तालय आणि महापालिकेचा परस्परविरोधी निर्णय
15
'मुन्नाभाई MBBS'मधला स्वामी आता दिसतो खूपच वेगळा, लेटेस्ट फोटो पाहून चाहते झाले अवाक्
16
Fact Check: 'जर्सी नं. 7' धोनीच्या सन्मानार्थ RBI ७ रुपयांचं नाणं आणणार?; व्हायरल दाव्यामागील सत्य वेगळंच
17
खासगी विमान, ३० हून अधिक लक्झरी कार्स, परदेशात मालमत्ता; नायजेरियाच्या राष्ट्रध्यक्षांची संपत्ती किती?
18
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
19
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
20
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?

त्रिपुरा हिंसाचाराची आग; अमरावतीच्या चांदणी चौकात दोन समुदायांचे गट आमने-सामने, पोलिसांचा हवेत गोळीबार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2021 3:05 PM

यावेळी मोर्चेकऱ्यांवर वज्र वाहनातून पाण्याचा मारा करण्यात आला. शुक्रवारच्या तणावामुळे शहरात काही तरी अघटित घडणार, अशी अटकळ बांधली जात होती. ही भीती खरी ठरली. बंदच्या अनुषंगाने अमरावती शहरातील बहुतांश दुकाने आज उघडलीच नाही. 

अमरावती -त्रिपुरातील हिंसाचाराच्या निषेधार्थ शुक्रवारी मुस्लीम समुदायाने पुकारलेल्या बंद दरम्यान प्रचंड दगडफेक झाली. त्याच्या निषेधार्थ भाजपने शनिवारी अमरावती बंदची हाक दिली होती. या बंद दरम्यान शहराचे हृदयस्थान असलेल्या राजकमल चौकातून निघालेल्या मोर्चेकऱ्यांनी दगडफेक करीत काही दुकानांना लक्ष्य केले. तोडफोड व जाळपोळही केली. त्यांना अटकाव करण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज व अश्रुधुराचा वापर केला. एवढेच नाही, तर येथील चांदणी चौक भागात दोन समुदायांचे गट आमने-सामने आले होते. तसेच परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचा हवेत गोळीबारही करावा लागला.(Groups of two communities Face to face in Amravati Chandni Chowk) 

यावेळी मोर्चेकऱ्यांवर वज्र वाहनातून पाण्याचा मारा करण्यात आला. शुक्रवारच्या तणावामुळे शहरात काही तरी अघटित घडणार, अशी अटकळ बांधली जात होती. ही भीती खरी ठरली. बंदच्या अनुषंगाने अमरावती शहरातील बहुतांश दुकाने आज उघडलीच नाही. 

वाहनांची जाळपोळ लाखोंचे नुकसान - वाहने व गाड्यांच्या जाळपोळीतून लाखोंचे नुकसान झाले आहे. तथापि, इतवारा बाजार परिसरातील मुस्लिमबहुल भागात तगडा बंदोबस्त पोलिसांनी यापूर्वीच लावला. त्या भागातून मोर्चेकऱ्यांना परतवून लावण्यात पोलीस यशस्वी ठरले. 

यादरम्यान अमरावती शहरात पुढील चार दिवस संचारबंदी व इंटरनेट बंदी लागू करण्यात आली असल्याचे सुटीवर असलेल्या पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी सांगितले. अमरावतीकरिता तातडीने रवाना झालो असून सायंकाळपर्यंत शहर गाठू, असे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. 

युवकाचा पंजा गायब - पोलिसांनी जमावाच्या दिशेने सोडलेले अश्रुधुराचे नळकांडे मोर्चेकऱ्यांपैकी एकाने झेलले. ते त्याच्या हातातच फुटले व संपूर्ण पंजा क्षतविक्षत होऊन गायब झाला. राजकमल चौकात हा प्रकार घडल्याचे वृत्त आहे.

टॅग्स :AmravatiअमरावतीTripuraत्रिपुराHinduहिंदूMuslimमुस्लीमPoliceपोलिस