गुलिस्तानगरातील घटना : शेख जफरचा साथीदार आरीफ लेंड्या गंभीर; तिघांना अटकअमरावती : चांदणी चौक गोळीबार प्रकरण अद्याप शांत झाले नाही, तोच सोमवारी सायकांळी ४ वाजताच्या सुमारास शेख जफरचा साथीदार आरीफ लेंड्यावर १० ते १२ हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला करुन दोन गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात आरीफ लेंड्या गंभीर जखमी झाला असून त्यांच्या नातेवाईकांनी हल्लेखोरांवर दगडफेक केल्याने हल्लेखोर दुचाकी सोडून पसार झाले. या प्रकरणात नागपुरी गेट पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून परिसरात तगडा बंदोबस्त केला आहे. पोलीस सूत्रानुसार, चांदणी चौक गोळीबार प्रकरणातील शेख जफरचा साथीदार सैयद आरीफ ऊर्फ लेंड्या सैयद साबीर (४२) गुलिस्तानगरातील रहिवासी आहे. एक आठवड्यापूर्वीच आरीफ लेंड्या जामिनवर बाहेर आला. माहितीनुसार गुलिस्तानगरात आरीफ लेंड्याचा भाऊ राहत असून त्यांच्या मुलीचे रविवार लग्न झाले. दुसऱ्या दिवशी यवतमाळात रिसेप्शन असल्यामुळे सर्व नातेवाईक सायंकाळी ४ वाजता तयारीत लागले होते. यावेळी आरीफ लेंड्या भावाच्या दुकानासमोर मोबाईलवर बोलत होता. पोलिसांचे सर्चिंग आॅपरेशन१० ते १२ दुचाकीवर आलेल्या हल्लेखोरांनी आरिफ लेंड्यावर सशस्त्र हल्ला चढविला. या हल्लात आरीफ लेंड्या रक्तबंबाळ झाल्याने खाली कोसळला. यावेळी एका हल्लेखोराने आरीफ लेंड्यावर देशीकट्टट्याने दोनदा गोळ्या झाडल्या. हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली. ही बाब लक्षात येताच आरीफ लेंड्याच्या नातेवाईकांनी हल्लेखोरांवर दगडफेक सुरु केली. त्यावेळी हल्लेखोरांनी ट्रान्सपोर्ट नगराकडे पलायन केले. गंभीर अवस्थेत आरीफ लेंड्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सद्यस्थितीत आरीफ लेंड्याची प्रकृती चितांजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र जखमी आरीफ याने नागपुरी गेट पोलिसांनी दिलेल्या बयाणात बाबाद्दीन बद्रोद्दीन, कैमुद्दीन बद्रोद्दिन, कलंदरोद्दीन, नियजुद्दीन, अज्जु ऊर्फ रियाजुद्दीन, वसीम चायना, अहेफाज, हबीब, शाबीर पहेलवान आणि अशर चायना यांनी हल्ला केल्याचे सांगितले आहे. आरीफच्या बयाणावरून पोलिसांनी तत्काळ बाबाद्दीन, त्यांचा भाऊ कंलदरोद्दीन व अहेफाज यांना अटक केली आहे. या घटनेची माहिती मिळताच तत्काळ पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे, सहाय्यक आयुक्त एल.एन. तळवी, गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी पोहचले. तणावपूर्ण स्थितीवर नियंत्रण मिळविण्याचे तत्काळ प्रयत्न सुरु करण्यात आले. गुलिस्ता नगरात पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला असून शहरात नाकाबंदी करुन आरोपीचा शोध घेणे सुरु केले आहे. नागपुरी गेट ठाण्याच्या परिसरात सर्चिंग आॅपरेशन सुरु करण्यात आले असून बडनेरा व फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याव्यतिरीक्त पोलीस मुख्यालयाचे अधिकारी व पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. टोळीयुद्धातून दुसऱ्यांदा गोळीबार झाल्याने मुस्लिमबहुल परिसर हादरून गेला आहे. या भागात बंदूकी आल्या कोठून हा पोलिसांसाठी संशोधनाचा विषय आहे. जुन्या वादातून गोळीबाराचे प्रकरण झाल्याचे बोलले जात असले तरी यामागे राजकारण असल्याचीही चर्चा सोमवारी ऐकावयास मिळाली.
पुन्हा गोळीबार; टोळीयुद्ध पेटले
By admin | Published: January 12, 2015 10:41 PM