शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
2
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
3
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
4
हार्दिक पांड्या बनला T20 क्रमावारीत नंबर १! तिलक वर्माचाही Top 3 मध्ये दिमाखात प्रवेश
5
Fact Check : रोहित शर्माच्या मुलाच्या नावाने 'ते' फोटो होताहेत व्हायरल; जाणून घ्या, 'सत्य'
6
Kedar Dighe : केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
7
लेकीचं नाव 'ऐजाह' ठेवल्यामुळे ट्रोल झाली टीव्ही अभिनेत्री, आले आक्षेपार्ह मेसेज; म्हणाली...
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
9
अखिलेश यादव यांच्या आरोपांनंतर EC ची मोठी कारवाई; निवडणूक आयोगाने दिल्या सूचना, अनेक अधिकारी निलंबित
10
"तुम्ही राजकारणाची पद्धत बदला!", शशांक केतकरची मतदानानंतरची पोस्ट चर्चेत
11
AR Rahman Net Worth : एका गाण्याची फी ३ कोटी, देश-विदेशात स्टुडिओ; ए.आर.रहमान यांची नेटवर्थ किती?
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
13
तुळजापूरमध्ये अधिकारीच दुसरं बटण दाबायला सांगत असल्याचा व्हिडिओ व्हायरल
14
"BCCI नाही, BJP सरकार...!"; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताच्या भूमिकेवर शोएब अख्तरचं मोठं विधान
15
सपाला मतदान करण्यास विरोध केला म्हणून तरुणीची हत्या; मैनपुरी हादरली, बलात्काराचाही संशय
16
Jio युजर्स सतर्क व्हा! तुमच्या एका चुकीमुळे कॉल हिस्ट्री दुसऱ्याच्या हाती लागू शकते
17
अमेरिकेसारख्या देशांना कर्जावर नियंत्रण ठेवावं लागेल, आणीबाणीसारख्या परिस्थितीत.., रघुराम राजन यांचा इशारा
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "तुझा मर्डर फिक्स", सुहास कांदेंची समीर भुजबळांना जीवे मारण्याची धमकी; दोन्ही गटात जोरदार वादावादी
19
"१०:३० वाजता मतदानाला गेले, फक्त तीनच लोक", रस्त्यांची दुरवस्था दाखवत बॉलिवूड अभिनेत्री म्हणते- "जर तुम्हाला..."
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: 1962 ते 2019... प्रत्येक निवडणुकीत अपक्षांनी किती मते खाल्ली?

येवद्यात जिल्ह्यातील पहिले शेततळे

By admin | Published: January 24, 2017 12:23 AM

‘मागेल त्याला शेततळे’ योजनेंतर्गत येवदा गावातील शेतकरी बंडू चोरे यांच्या शेतात जिल्ह्यातील पहिले शेततळे तयार करण्यात आले.

प्रात्यक्षिक : कृषी आयुक्तांसह जिल्हाधिकाऱ्यांची उपस्थिती येवदा : ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेंतर्गत येवदा गावातील शेतकरी बंडू चोरे यांच्या शेतात जिल्ह्यातील पहिले शेततळे तयार करण्यात आले. यानिमित्ताने या शेतकऱ्याचा गौरवदेखील करण्यात आला. रविवारी या शेततळ्याचे प्रात्यक्षिक पाहण्याकरिता व परिसराचे सर्वेक्षण करण्याकरिता महाराष्ट्र राज्य कृषी आयुक्त विकास देशमुख, जिल्हाधिकारी किरण गित्ते, विभागीय कृषी संचालक सु.रा.सरदार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मुळे, दर्यापूरचे उपविभागीय अधिकारी राठोड, उपविभागीय कृषी अधिकारी कुलकर्णी, तालुका कृषी अधिकारी व्ही.डी.लंगोटे, कृषी अधिकारी जी.ओ. कळस्कर, तहसीलदार राहुल तायडे उपस्थित होते. राजस्थानी ट्रॅक्टर्सच्या मदतीने खोदण्यात येणारे शेततळे नागरिकांना आकर्षित करीत आहेत. जेवढे पाणी ट्रेनने लातूर येथे नेले गेले तेवढेच पाणी या शेततळ्यात गोळा केले जाऊ शकते, अशा प्रतिक्रिया यावेळी उपस्थितांनी व्यक्त केल्यात. कृषी सहायकांच्या माध्यमातून गावातील शेततळे आॅनलाईन करण्याबाबत आढावा घेण्यात आला. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी व्ही.बी.भोई यांना या परिसरात अधिकाधिक शेततळे करण्याचे आव्हान सोपविण्यात आले.राज्य शासनाने शेतकऱ्यांकरिता ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत दर्यापूर तालुक्यासाठी ३ हजार ४०० शेततळ्यांचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत प्रत्येक गावातील कृषी सहायकाने १०० शेततळे खोदावेत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. (वार्ताहर)